स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करणे हे सध्या परिस्थितीमध्ये थोडीशे सोपे झाल्याचे चित्र आहे. कारण आता सहजरित्या सुलभ व्याजदरामध्ये होम लोनच्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे स्वतःकडे कमीत कमी जरी पैसे असतील तरी होमलोनच्या मदतीने स्वतःचे घर घेणे शक्य झालेले आहे.
जर आपण मोठ्या शहरांचा विचार केला तर त्या ठिकाणी घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक व्यक्ती हे आयुष्यभराची आपली जमा केलेली पुंजी गुंतवतात व फ्लॅट खरेदी करतात. त्यामुळे स्वतःचे घर एखाद्या मोठ्या शहरांमध्ये आहे याचे आपल्याला समाधान मिळतेच परंतु स्वप्न देखील पूर्ण होते.
परंतु अशा व्यवहारांमध्ये बऱ्याचदा आपण काही गोष्टींचा विचार करत नाही व त्याची खरेदी करून मोकळे होतो. परंतु याबाबत काही नियम आपण पाळत नाहीत व कालांतराने यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात पश्चाताप करण्याची वेळ येते. त्यामुळे आपण एखाद्या शहरांमध्ये घर किंवा फ्लॅट खरेदी करायचा असेल तर काही नियमांचा विचार करून घेणे खूप गरजेचे आहे. नेमके घर किंवा फ्लॅट कधी करताना कोणते नियम तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे? त्याबद्दलचे महत्त्वाची माहिती या लेखात घेऊ.
शहरामध्ये घर खरेदी करा, परंतु या गोष्टींकडे लक्ष द्या
साधारणपणे प्रॉपर्टी म्हणजेच मालमत्तेचे दोन प्रकार असतात त्यातील पहिला म्हणजे लिजहोल्ड आणि दुसरा म्हणजे फ्री होल्ड हे होय. यातील जर आपण फ्री होल्ड या प्रकाराच्या मालमत्तेचा विचार केला तर यावर तुमच्या शिवाय इतर कोणत्याही व्यक्तीचा अधिकार नसतो.
म्हणजे तुम्ही फ्रीहोल्ड मालमत्ता खरेदी केली तर कायमस्वरूपी तुम्हीच त्या मालमत्तेचे मालक असतात व तुम्हाला ती तुमच्या पद्धतीने विकता देखील येऊ शकते किंवा त्यात बदल देखील केला जाऊ शकतो. परंतु जर त्या तुलनेत लीजहोल्ड मालमत्तेचा विचार केला तर या प्रकारामध्ये एखाद्या व्यक्तीला ठराविक कालावधी करिता किंवा काही अटींवर संबंधित घराचा किंवा फ्लॅटचा किंवा एखाद्या मालमत्तेचा हक्क दिला जातो.
हा कालावधी काही शहरांमध्ये दहा वर्षापासून ते 50 वर्षापर्यंत आहे. परंतु फ्लॅटचे बाबतीत विचार केला तर साधारणपणे 99 वर्षाच्या भाडे तत्त्वावर त्या विकल्या जातात. ही मालकी संपल्यानंतर मात्र संबंधित सदनिकाची म्हणजेच फ्लॅटची मालकी पुन्हा अगोदरच्या मालकाकडे जाते. हे झाले मालमत्तेचे दोन प्रकार.
मग काय आहेत याबाबतचे नियम?
फ्लॅट जर खरेदी करायचा असेल तर तो साधारणपणे 99 वर्षाच्या भाडेतत्त्वावर विकला जातो. याचा जर सुटसुटीत अर्थ पाहिला तर खरेदी दाराकडे त्या फ्लॅटची मालकी 99 वर्षांसाठी असते. 99 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मात्र त्या फ्लॅटचे किंवा जमिनीची मालकी मूळ मालकाकडे परत जाते. एखाद्या वेळ हा भाडेपट्टाचा जो काही कालावधी आहे
तो संपण्याच्या अगोदर जर इमारत कोसळली, ज्या जमिनीवर फ्लॅट/ टॉवर बांधण्यात आले होते त्या या जमिनीची संख्या कमी केली जाईल. सध्याचे सर्कल रेटच्या आधारे ते सर्व फ्लॅट मालकांमध्ये समान समभागांमध्ये विभागले गेले आहे. अशावेळी प्रश्न मनामध्ये येतो की 99 वर्षाच्या भाडेतत्त्वावर जर आपण फ्लॅट विकत घेतला व तो आपल्याला दहा वर्ष त्याचा वापर केल्यानंतर आपल्याला तो विकायचा आहे तर तो विकता येतो का?
याचे उत्तर नाही असे आहे. कारण लिजहोल्ड मालमत्ता खरेदी केली असेल तर ती विकता येत नाही. यामध्ये फक्त उरलेला जो काही भाडेपट्ट्याचा कालावधी आहे तेवढाच कालावधी हस्तांतरित करण्याचा अधिकार आपल्याला मिळतो. त्यासाठी संबंधित प्राधिकरणाची परवानगी घेणे देखील गरजेचे असते. यामध्ये फक्त तुम्ही फ्रीहोल्ड मालमत्ता कायमची विकू शकतात. तुमच्याकडे जर फ्री होल्ड मालमत्ता आहे व तुम्हाला ती भाडेतत्त्वावर द्यायची असेल तर तुम्हाला तो अधिकार आहे.
लिजहोल्ड मालमत्ता फ्रीहोल्डमध्ये रूपांतरित करता येते का?
तुम्ही लीजहोल्ड प्रॉपर्टी खरेदी केली आहे व तुम्हाला ती फ्री होल्ड मध्ये ट्रान्सफर करायचे आहे तर त्यासाठी काही नियम आहेत व त्या नियमांचे पालन करणे गरजेचे असते. यामध्ये साधारणपणे दोन पद्धती असतात व यामधील पहिली पद्धत म्हणजे अनेक वेळा त्या मालमत्तेचा जो काही विकासक म्हणजेच बिल्डर असतो तो वेळोवेळी मालमत्ता फ्री होल्ड मध्ये रूपांतरित करण्याचा पर्याय देत असतो.
जोपर्यंत त्या बिल्डरकडे संबंधित मालमत्तेची मालकी हक्क असतात तोपर्यंत तो देखील हे करू शकतो. तसेच अगोदरच त्याची मालमत्ता लिजवर असेल तर तो तुम्हाला फ्री होल्डचा पर्याय देऊ शकत नाही.
तसेच दुसरी बाजू म्हणजे दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही ज्या राज्याची मालमत्ता खरेदी केली आहे व त्या ठिकाणचे सरकार फ्लॅट मालकांना बऱ्याचदा लीज होल्ड कालावधीत मालमत्ता फ्री होल्डमध्ये रूपांतरित करण्याचा पर्याय देते. अशावेळी मात्र तुम्ही तुमच्या लिज होल्ड प्रॉपर्टीचे रूपांतर फ्री होल्ड मध्ये करू शकतात.