महाराष्ट्र शासनाच्या अनेक विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा असून या जागा भरण्याकरिता आता शासनाकडून निर्णय घेण्यात येत आहेत. गेल्या कोरोना कालावधीपासून राज्यातील सर्व भरती प्रक्रिया थांबवण्यात आलेल्या होत्या. परंतु आता टप्प्याटप्प्याने विभागनिहाय भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत.
यासंबंधी जर आपण कृषी विभागाचा विचार केला तर कृषी विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधीनस्त असलेले जे कार्यालय आहे त्यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या वरिष्ठ लिपिक तसेच सहाय्यक अधीक्षक, लघु टंकलेखक, लघु लेखक ( निम्न आणि उच्च श्रेणी ) वर्गातील रिक्तपदे सरळसेवेने आता भरण्यात येणार आहेत.
या भरतीची महत्त्वाची जाहिरात
कृषी विभागातील रिक्त जागांसाठी घेण्यात येणाऱ्या भरती बाबतची सुधारित जाहिरात 11 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून या जाहिरातीनुसार विचार केला तर कृषी विभागातील कृषी आयुक्तालयाच्या कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयाच्या आस्थापनेवरील दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक, लघु टंकलेखक, लघुलेखक( उच्च व निम्न श्रेणी) या संवर्गातील पदांसाठी सरळसेवेने पदभरती करिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
तसे पाहायला गेले तर या रिक्त पदांच्या भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 होती. परंतु गट क संवर्गातील जे काही पदे भरण्यासाठी ही जाहिरात काढण्यात आलेली होती त्यानुसार यामध्ये अर्ज करण्याची जी काही प्रणाली होती यामध्ये जुन्या निकषानुसार खुल्या प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावर अर्ज करण्यासाठी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ज्या महिला उमेदवारांकडे नव्हते अशा महिला उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील पदाकरिता अर्ज करता आलेला नव्हता.
तसेच 4 मे 2023 मध्ये महिला व बाल विकास विभागाने घेतलेल्या शासन निर्णयातील तरतुदींमुळे देखील काही उमेदवार अर्ज करण्यास अपात्र ठरलेले होते. त्यामुळे या सगळ्या बाबी डोळ्यासमोर ठेवून भरती करिता अर्ज करण्यासाठी दहा दिवसांची मुदत वाढ द्यायचा निर्णय कृषी विभागाने घेतलेला आहे.
आता या कालावधीपर्यंत करता येतील अर्ज
त्यामुळे आता विभागामार्फत नवीन सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या जाहिरातीनुसार या रिक्त पदांकरिता अर्ज करण्यासाठीची लिंक ही 13 जुलै 2023 पासून सुरू करण्यात आलेली असून अंतिम मुदत 22 जुलै 2023 आहे. या कालावधीमध्ये आता ज्या उमेदवारांना या अगोदर अर्ज करता आलेले नाहीत असे उमेदवार या कालावधीत अर्ज करू शकणार आहेत.