10th 12th Student Get 10 Thousand : दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे रिजल्ट नुकतेच जाहीर झाले आहेत. या परीक्षेत लाखो विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. यामध्ये अनेकांनी चांगली कामगिरी केली असून परीक्षेत प्रथम क्रमांक देखील पटकावला आहे.
खरंतर दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात. दहावी आणि बारावीनंतरच विद्यार्थ्यांच्या करिअरला योग्य दिशा मिळत असते. दरम्यान दहावी आणि बारावी मध्ये चांगले यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे हे शासनाचे कामच आहे.
यासाठी विविध योजना शासनाकडून चालवल्या जातात. दरम्यान दहावी आणि बारावी मध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
हे पण वाचा :- दिल्ली-मुंबई ते मुंबई-पुणे….; महाराष्ट्रात तयार होतायेत तब्बल 14 नवीन महामार्ग, पहा यादी
या पुरस्काराच्या माध्यमातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला दहा हजारापर्यंतची रोख रक्कम देखील वितरित केली जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून दहावी आणि बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या अनुसूचित जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
यासाठी नागपूर जिल्ह्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक व प्राचार्यांनी सन २०२३-२४ या सत्रातील फेब्रुवारी व मार्च २०२३ मध्ये दहावी, बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या अनुसूचित जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारासाठी प्रस्ताव निकाल कळल्यानंतर सादर करावेत असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
या पुरस्कारासाठी पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर यांचेकडे सादर करणे आवश्यक असते. यामुळे नागपूर जिल्हा समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून असे प्रस्ताव संबंधित प्राचार्यांनी आणि मुख्याध्यापकांनी सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
या पुरस्काराबाबत अधिक माहितीसाठी कार्यालय सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय आय. टी. आय समोर श्रद्धानंदपेठ, नागपूर येथे संपर्क करता येणार आहे.
निश्चित, दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेत अनुसूचित जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या नेत्र दीपक यशासाठी या संबंधित विद्यार्थ्यांना दिला जाणारा हा पुरस्कार त्यांचे मनोबल वाढवण्याचे काम करणार आहे.
हे पण वाचा :- सोयाबीनच्या उच्च उत्पादन देणाऱ्या जाती कोणत्या आणि त्यांच्या विशेषता, पहा…