10th And 12th Board Exam : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही ही दहावी किंवा बारावीच्या वर्गात असाल किंवा तुमचे पाल्य जर 10 वी, 12वी ला असतील तर आजची ही बातमी तुम्ही पूर्णच वाचायला हवी.
खरंतर महाराष्ट्र राज्य बोर्डाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी दहावी आणि बारावी बोर्डाचे वेळापत्रक फायनल केले आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
यंदा बोर्डाने दहा दिवस अगोदरच परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. दहावी आणि बारावी बोर्डाच्या दोन पेपरांच्या दरम्यान दोन-तीन दिवसांचा गॅप सुद्धा ठेवण्यात आला आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास करता येईल.
अशा परिस्थितीत आज आपण या दोन्ही वर्गांच्या बोर्ड परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेणार आहोत. कोणत्या विषयाचा पेपर कोणत्या तारखेला आहे या संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत.
दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक कसे आहे?
दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा या 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 17 मार्चपर्यंत या परीक्षा सुरू राहतील. या लेखी परीक्षांच्या आधी या विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल देखील घेतले जाणार आहे.
21 फेब्रुवारी :- मराठी
1 मार्च :- इंग्रजी
3 मार्च :- हिंदी
5 मार्च :- गणित भाग-1 (बीजगणित)
7 मार्च :- गणित भाग-2 (भूमिती)
10 मार्च :- विज्ञान तंत्रज्ञान भाग-1 (Science & Tech – I)
12 मार्च :- विज्ञान तंत्रज्ञान भाग-2 (Science & Tech – II)
15 मार्च :- समाजशास्त्र भाग-1 (इतिहास व राज्यशास्त्र)
17 मार्च :- समाजशास्त्र भाग-2 (भूगोल)
बारावी बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक?
बारावी बोर्डाची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. या काळात बारावी बोर्डाची लेखी परीक्षा घेतली जाणार असून याआधी त्यांची प्रात्यक्षिक परीक्षा देखील होणार आहे.
11 फेब्रुवारी:- इंग्रजी
12 फेब्रुवारी:-हिंदी
13 फेब्रुवारी:- मराठी
17 फेब्रुवारी:- भौतिकशास्त्र (Physics)
20 फेब्रुवारी:- रसायनशास्त्र (Chemistry)
22 फेब्रुवारी:- गणित (Mathematics)
25 फेब्रुवारी:- सहकार (Co-operation)
27 फेब्रुवारी:- जीवशास्त्र (Biology)
1 मार्च:- भूशास्त्र/अर्थशास्त्र (Geology/Economics)
7 मार्च:- भूगोल (Geography)
8 मार्च:- इतिहास (History)
11 मार्च:- समाजशास्त्र (Sociology)