स्पेशल

शेवटी निर्णय झालाच ! ‘या’ तारखेला जाहीर होणार 10वी, 12वी चे निकाल, वाचा सविस्तर

10th Result Maharashtra : महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा झाल्या आहेत. बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत झाल्या असून दहावीच्या परीक्षा या 2 मार्च ते 25 मार्च दरम्यान घेण्यात आल्या होत्या.

आता बोर्ड एक्झाम झाल्या आहेत आणि बोर्ड परीक्षा झाल्यानंतर नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना चाहूल लागली आहे ती निकालाची. दरम्यान आता दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत एक मोठी अपडेट हाती आली आहे.

हे पण वाचा :- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा नादच खुळा! चक्क पांढऱ्या जांभळाची केली लागवड, एका एकरात झाली 4 लाखांची कमाई, पहा ही यशोगाथा

मिळालेल्या माहितीनुसार दहावी आणि बारावीचे निकाल पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत लागणार आहेत. याबाबत मात्र बोर्डाकडून अधिकारीक माहिती देण्यात आलेली नाही. परंतु अनेक मीडिया रिपोर्टमध्ये दहावी आणि बारावीचे निकाल जून अखेरपर्यंत लागतील अशी माहिती देण्यात आली आहे. यामुळे आता येत्या एका महिन्यात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार आहे.

कुठं पाहणार निकाल

दहावी आणि बारावीचा निकाल पाहण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देता येणार आहे. maharesult.nic.in आणि mahahsscboard.in या दोन वेबसाईटवर जाऊन दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी, परीक्षार्थी आपला रिझल्ट पाहू शकणार आहेत.

हे पण वाचा :- पुणे ते नाशिक प्रवास होणार सुपरफास्ट; प्रवाशांचा अर्ध्या तासाचा वेळ वाचणार, ‘हा’ अति महत्त्वाचा मार्ग वाहतुकीसाठी खुला, वाचा सविस्तर

कसा पाहता येणार रिजल्ट?

रिझल्ट पाहण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाकडून रिझल्ट डिक्लेअर झाले की वर नमूद केलेल्या दोन संकेतस्थळांपैकी म्हणजेच वेबसाईट पैकी कोणत्याही एका वेबसाईटवर तुम्हाला भेट द्यावी लागेल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर होम पेजवर SSC किंवा HSC रिझल्ट नावाचा पर्याय दिसेल.

यापैकी तुम्हाला ज्या वर्गाचे रिझल्ट पाहायचे आहेत म्हणजे दहावी किंवा बारावी ते सिलेक्ट करायचे आहे. यानंतर तुम्हाला तुमचा वैयक्तिक तपशील म्हणजेच तुमचा सीट नंबर म्हणजेच आसन क्रमांक आणि तुमच्या आईचे नाव टाकायचे आहे. यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे मग तुमचा रिझल्ट तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

हे पण वाचा :- 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! इस्रो मध्ये निघाली भरती, आजच करा अर्ज

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts