12th Pass Job : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आजची ही बातमी विशेष खास राहणार आहे. ती म्हणजे भाभा अनुसंशोधन केंद्रात काही रिक्त जागांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे.
या भरतीच्या माध्यमातून तब्बल चार हजार 374 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी बारावी पास तसेच पदवीधर उमेदवार पात्र राहणार आहेत.
यामुळे जर तुम्हालाही भाभा अनुसंशोधन केंद्रात नोकरी करण्याची इच्छा असेल आणि आपण बारावी पास किंवा पदवीधर असाल तर या पदभरतीसाठी लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने आपणास अर्ज करावा लागणार आहे.
दरम्यान आज आपण या पदभरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती थोडक्यात पण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.हे पण वाचा :- बारावी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी ! ICMR मध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती, पहा डिटेल्स
कोणत्या रिक्त पदांसाठी होणार आहे भरती
विविध विभागांमध्ये स्टायपेंडरी ट्रेनी, तांत्रिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक (अन्न तंत्रज्ञान / गृह विज्ञान / पोषण) आणि तंत्रज्ञ (बॉयलर अटेंडंट) या पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे.
किती पदांसाठी होणार भरती
रिक्त पदांच्या जवळपास 4,374 जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता?
या पदांसाठी पदानुसार बारावी पास ते पदवीधर उमेदवार पात्र राहणार आहेत. शैक्षणिक पात्रते संदर्भात अधिक आणि सखोल माहिती जाणून घेण्यासाठी एकदा मात्र अधिसूचना वाचावी लागणार आहे.
हे पण वाचा :- रेशन दुकानदाराने रेशन देण्यास नकार दिला किंवा कमी धान्य दिले तर ‘या’ नंबरवर करा तक्रार, कडक कारवाई होणार
उमेदवाराची निवड कशी होणार
वर नमूद करण्यात आलेल्या पदांसाठी लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि कागदपत्रांच्या पडताळणीनंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
अर्ज कसा करावा लागणार?
यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा लागणार आहे. barc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उमेदवार आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकतील.
अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक
या पदांसाठी 22 मे 2023 पर्यंत इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.