Lonawala Link Road:- महाराष्ट्रमध्ये अनेक महत्त्वाच्या अशा रस्ते प्रकल्पांची कामे सुरू असून येणाऱ्या कालावधीत या प्रकल्पांमुळे वाहतुकीच्या समस्या तर मिटणार आहेतच परंतु अनेक शहरांमधील प्रवासाचे अंतर देखील कमी होण्यास मदत होणार आहे. यामध्ये जर आपण पुणे ते मुंबई हा प्रवास जर बघितला तर साधारणपणे 160 किलोमीटर असून त्याकरिता चार तासांचा वेळ लागतो.
परंतु या मार्गावर कायमच ट्रॅफिक मोठ्या प्रमाणावर होते व अनेकदा ट्रॅफिक कोंडीची समस्या उत्पन्न होऊन मोठ्या प्रमाणावर प्रवाशांना त्रास होतो.
परंतु आता मुंबई आणि पुणेकरांसाठी अत्यंत फायद्याचा ठरेल असा पुणे ते मुंबई दृतगती महामार्गावरील लिंक रोडचे काम सुरू असून ते काम आता 90% पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे.
राहिलेले दहा टक्के काम हे जून 2025 मध्ये पूर्ण होण्याची शक्यता असून त्यानंतर हा लिंक रोड प्रवाशांसाठी खुला होईल अशी एक शक्यता आहे.
पुणे ते नवी मुंबई प्रवासात वाचतील तीस मिनिटे
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे व मुंबईकरांसाठी अत्यंत फायद्याचे ठरणारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढील चार महिन्यांमध्ये सुरू होईल अशी एक शक्यता आहे.
त्यामध्येच पुणे ते मुंबई द्रूतगती महामार्गावरील लिंक रोडचे काम देखील आता 90% पर्यंत पूर्ण झाले आहे व उरलेले दहा टक्के काम हे जून 2025 मध्ये पूर्ण होऊ शकते व त्यामुळे येणाऱ्या सहा महिन्यांनी पुणे ते नवी मुंबई विमानतळावर जाण्याचा वेळ कमी होणार आहे.
यामध्ये लोणावळा शहराच्या बाहेरून द्रुतगती मार्गाला समांतर जाईल असा एक लिंक रोड तयार केला जात आहे व त्यामुळे लाखो प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. सध्या जर आपण पुणे आणि मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरातील अंतर बघितले तर ते 160 किलोमीटर असून हे अंतर कापण्याकरिता साधारणपणे सध्या चार तासांचा वेळ लागतो.
त्यातच नवी मुंबई विमानतळ ते पुणे हे अंतर 120 किलोमीटर आहे. परंतु जेव्हा हा लिंक रोड सुरू होईल तेव्हा आताच्या प्रवासाला जो काही चार तासांचा कालावधी लागतो त्यामध्ये तीस मिनिटांची बचत होणार आहे.
6595 कोटी किमतीचा आहे हा प्रकल्प
प्राप्त माहितीनुसार या प्रकल्पाची किंमत 6595 कोटी रुपये आहे. या प्रकल्पामध्ये घाटातला जो काही रस्ता आहे तो पूर्ण टाळून थेट पुढे जाता यावे याकरिता हा लिंक रोड तयार करण्यात येत आहे.
यामध्ये खोपोली ते कुसगाव पर्यंतचा जो काही टप्पा आहे तो शून्य अपघात क्षेत्र करण्याचा प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून केला जात आहे. तसेच खोपोली घाटाच्या परिसरामध्ये जी काही वाहतूक कोंडी होते ती देखील कमी करता येणे शक्य होणार आहे.
2019 मध्ये या प्रकल्पाचे काम सुरू झाले व 2022 मध्येच हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु मध्यंतरी जेव्हा कोरोनाचे संकट आले होते तेव्हा हे काम रखडले होते व आता जून 2025 ची डेडलाईन याकरिता देण्यात आली आहे.
या लिंक रोडमुळे पुणे ते मुंबई द्रूतगती मार्गाचे अंतर 6.5 किलोमीटरने होईल कमी
जेव्हा हा लिंक रोड प्रवासासाठी खुला होईल तेव्हा पुणे ते मुंबई द्रूतगती मार्गाचे अंतर साधारणपणे 6.5 किलोमीटरने कमी होणार आहे. जेव्हा हा लिंक रोड सुरू होईल तेव्हा खोपोली एक्झिट पासून कुसगाव सिंहगड इन्स्टिट्यूट पर्यंतचा
जो काही प्रवासाचा टप्पा आहे तो टाळता येणार आहे. 13.3 किलोमीटर लांबीचा हा लिंक रोड असून यातील 8.9 km चा भाग घाटातून जातो तर 1.7 किलोमीटरचा बोगदा आहे. तसंच या मार्गामध्ये अनुक्रमे 840 मीटर आणि 650 मीटरचे दोन केबल ब्रिज देखील आहेत.