स्पेशल

शेतकऱ्यांसाठी आनंदाची पर्वणी ! प्रोत्साहन अनुदानाच्या दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांना अनुदान वितरणास सुरुवात, ‘या’ दिवशी येणार तिसरी यादी

50 Hajar Protsahan Anudan : नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान दिला जात आहे. खरं पाहता ही अनुदानाची योजना गेल्या महाविकास आघाडी सरकारने आपल्या कार्यकाळात आणली होती. मात्र गेल्या सरकारला आपल्या काळात या योजनेची अंमलबजावणी करता आली नाही.

दरम्यान आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार 2017 18, 2018 19 आणि 2019 20 या काळात नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देऊ करत आहे. या अनुषंगाने पहिली आणि दुसरी यादी लाभार्थी शेतकऱ्यांची समोर आली असून ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे अशा शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम देखील वितरित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

लातूर जिल्ह्यात नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या एक लाख 84 हजार 556 लाभार्थ्यांची यादी उपनिबंधक कार्यालयाकडून शासनाकडे पाठवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पहिल्या यादीमध्ये 48 हजार शेतकऱ्यांची जिल्ह्यातून नावे आलीत. या पहिल्या यादीतील 45 हजार शेतकऱ्यांना 152 कोटींच अनुदान व्यतिरिक्त झाले. आता दुसऱ्या यादीत जिल्ह्यातील 83 हजार शेतकऱ्यांची नावे आली आहेत.

म्हणजेच आतापर्यंत जिल्ह्यातून एक लाख 31 हजार 244 शेतकऱ्यांची प्रोत्साहन अनुदानासाठी नावे आली आहेत. यापैकी एक लाख 25 हजार 591 शेतकऱ्यांनी आधार प्रामाणिकरण केले असून त्यांना आता प्रत्यक्ष अनुदान मिळण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून 53 हजार शेतकरी बांधवांच्या खात्यावर प्रोत्साहन अनुदानाचे 182 कोटी 51 लाख वितरित झाले आहेत.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, चांद पर अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादीत नावे आल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना आधार प्रामाणिकरण करावे लागते. आधार प्रामाणिकरण करण्यासाठी यादीमध्ये दिलेला विशिष्ट क्रमांक आणि आधार क्रमांक उपयोगात आणला जातो. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याला बँकेत जाऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची रक्कम सांगितली जाते.

ती रक्कम शेतकऱ्यांना मंजूर असल्यास शेतकऱ्याची सहमती घेतली जाते आणि प्रत्यक्ष अनुदान वितरित होतं. या ठिकाणी एक गोष्ट विशेष अशी की जर एखाद्या शेतकऱ्याला प्रोत्साहन अनुदानाची रक्कम अमान्य असेल तर अशा शेतकऱ्याला तहसील स्तरावर तक्रार दाखल करता येते.

लातूर जिल्ह्यात तहसील स्तरावर 187 तक्रारी दाखल झाल्यात यापैकी 138 तक्रारी सोडवल्या गेल्या आहेत. डीएलसी स्तरावर 268 तक्रारी आल्या असून 102 तक्रारी सोडवल्या गेल्या आहेत. दरम्यान आता शेतकरी बांधव प्रोत्साहन अनुदानाची तिसरी यादी केव्हा येईल याबाबत उत्सुक आहेत.

50 Hajar Protsahan Anudan : मोठी बातमी ! ‘या’ दिवशी येणार प्रोत्साहन अनुदानाची तिसरी यादी, वाचा सविस्तर

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts