500 Rupees Note : केंद्रातील मोदी सरकारने सत्ता स्थापित केल्यानंतर अनेक अविश्वसनीय निर्णय घेतलेत. मोदी सरकारच्या काही निर्णयामुळे देशात मोठ्या प्रमाणात वाद विवादाची स्थिती देखील तयार झाली. काही निर्णयामुळे मोदी सरकारला टिकेचा सामना करावा लागला. असाच एक निर्णय म्हणजे नोटाबंदीचा. भारतात नोटाबंदीचा निर्णय झाला आणि कैक गोष्टी बदलल्यात.
नोटाबंदी नंतर देशात कॅशलेस इकॉनॉमिला चालना मिळाली. कॅश ऐवजी डिजिटल माध्यमातून पैशांचे व्यवहार मोठ्या प्रमाणात सुरू झालेत. केंद्रातील सरकारने 500 आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्यात आणि त्या जागेवर पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा बाजारात आणल्यात.
मात्र कालांतराने केंद्रातील मोदी सरकारने नवीन दोन हजार रुपयांची नोट देखील बंद केली. अशातच आता गेल्या काही दिवसांपासून पाचशे रुपयांच्या नोटांसंदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.
केंद्रातील मोदी सरकार दोन हजार रुपयांची नोट बंद केल्यानंतर आता पाचशे रुपयांपेक्षा अधिकचे मूल्य असणारी नोट बाजारात आणू शकते अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत.
यामुळे दोन हजार रुपयांची नोटबंदी झाल्यानंतर आता पाचशे रुपयांची नोट सुद्धा सरकार बंद करणार की काय अशी भीती देखील नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान, सोशल मीडियामध्ये आणि प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असणाऱ्या या चर्चा संसदेत देखील सुरु झाल्या आहेत आणि यावर केंद्रातील सरकारकडून स्पष्टीकरणही देण्यात आले आहे.
केंद्रातील सरकार खरच पाचशे रुपयांपेक्षा अधिक मूल्य असणारी नोट बाजारात आणू शकते का याबाबत अर्थ मंत्रालयाने मोठी माहिती दिलेली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की संसदेच्या वरिष्ठ सभागृहात अर्थातच राज्यसभेमध्ये खासदार घनश्याम तिवारी यांनी सरकार 500 हून अधिक मूल्य असणारी नोट वापरात आणणार का ? असा प्रश्न उपस्थित केला होता.
या प्रश्नाच्या उत्तरात राज्य अर्थमंत्री पंकज चौधरींनी नकारार्थी उत्तर दिलं. त्यांच्या या उत्तरानं केंद्राचा तूर्तास असा कोणताही बेत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. याबाबत, केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडूनच स्पष्ट उत्तर देण्यात आलं आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने म्हटल्याप्रमाणे, 500 रुपयांची नोट तर चलनात राहणार आहे.
पण, त्याहून जास्त मूल्य असणारी कोणतीही नोट नव्यानं चलनात येणार नाही. यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे मत जाणकार लोकांनी व्यक्त केले आहे. एकंदरीत सरकारने पाचशे रुपयांची नोट यापुढेही सुरूच राहणार आहे आणि यापेक्षा अधिक मूल्य असणारी नोटही बाजारात येणार नाही असे म्हटले आहे.