स्पेशल

गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटी बुडाले… सेन्सेक्स १४०० अंकांनी कोसळला

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- दक्षिण आफ्रिकेमध्ये करोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्याचं वृत्त जगभर पसरलं. याचे पडसाद भारतीय मार्केटवर झालेलं दिसून येत आहे.

शुक्रवारी मुंबई शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सची घसरण सुरू झाली. तब्बल १४०० अंकांनी सेन्सेक्स घसरला आहे. यामुळे गुंतवणूकदारांचं तब्बल ६ लाख कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

आज सकाळी, सेन्सेक्समध्ये ५४१ अंकांनी घसरण होऊन ५८,२५४.७९ अंकांवर सेन्सेक्स सुरू झाला. त्यानंतरही घसरण वाढत चालली आहे. त्यानंतर सेन्सेक्स ११०९ अंकांनी घसरला.

त्यानंतर सेन्सेक्सने ५७,७२७.५२० अंकावर गेला होता. तर, दुसरीकडे निफ्टीमध्येही घसरण दिसून आली.आज निफ्टी १९८ घसरणीसह १७,३३८.७५ अंकावर सुरू झाला.

त्यानंतर निफ्टीत घसरण होऊन १७,१७७.०५ अंकापर्यंत कोसळला. निफ्टीमध्ये जवळपास ३५९ अंकाची घसरण दिसून आली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts