7th Pay Commission : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे. सरकारी नोकरदार मंडळींच्या महागाई भत्त्यात लवकरच वाढ जाहीर केली जाणार आहे.
दिवाळीच्या आधीच महागाई भत्ता वाढीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे याची तारीख सुद्धा ठरली आहे. अर्थातच सरकारी नोकरदार मंडळीला आता दिवाळीपूर्वीचं मोठी भेट मिळणार आहे.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. मात्र लवकरच हा महागाई भत्ता आणखी वाढणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार महागाई भत्ता आणखी तीन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53% होणार असून ही वाढ जुलै 2024 पासून लागू केली जाणार आहे. मात्र याबाबतचा निर्णय हा ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. म्हणजे याचा लाभ हा ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबतच मिळणार आहे.
कधी वाढणार महागाई भत्ता?
मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर 23 ऑक्टोबरला केंद्रीय कॅबिनेटची बैठक संपन्न होणार आहे. या बैठकीत महागाई भत्ता वाढीबाबतच्या प्रस्तावावर सही केली जाणार आहे.
23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळात 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता जाहीर केला जाऊ शकतो. नक्कीच दिवाळीपूर्वी हा निर्णय घेण्यात आला तर याचा केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
23 ऑक्टोबरला महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय झाला तर ऑक्टोबर महिन्याच्या पगारांसोबतच याचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा पगार हा ऑक्टोबर मध्येच मिळण्याची शक्यता आहे. ही महागाई भत्ता वाढदिवसाच्या महिन्यापासून लागू राहणार असल्याने या पगारांसोबत केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३ महिन्यांची महागाई भत्ता थकबाकीही दिली जाणार आहे.