7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना नुकत्याच काही महिन्यांपूर्वी महागाई भत्ता वाढीची भेट देण्यात आली. ऑक्टोबर महिन्यात केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% वरून 53% केला आहे. महत्त्वाची बाब अशी की, जानेवारी 2025 पासून हा भत्ता आणखी तीन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , एआयसीपीआयच्या आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार जानेवारी 2025 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणखी तीन टक्क्यांनी वाढणार आहे अर्थातच हा भत्ता 56 टक्क्यांवर जाईल.
दरम्यान ही महागाई भत्ता वाढ लागू होण्याआधीच काही केंद्रीय कर्मचाऱ्यांचे दोन भत्ते वाढवण्यात आले आहेत. याचा परिणाम म्हणूनच संबंधित कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार आहेत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% क्रॉस झाल्यानंतर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एक महत्त्वाचे परिपत्रक निर्गमित करत नर्सिंग भत्ता आणि ड्रेस भत्ता सुधारित करण्याचा निर्णय घेतला आहे.
खरे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना लागू असणाऱ्या विविध भत्यामध्ये वाढ करण्यात आली होती. याचाच एक भाग म्हणून नर्सिंग भत्ता आणि ड्रेस भत्ता सुद्धा सुधारित करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे.
खरंतर याबाबतचे परिपत्रक 17 सप्टेंबर 2024 लाच निर्गमित झाले आहे. नर्सिंग भत्ता आणि ड्रेस भत्ता 25 टक्क्यांनी वाढवण्यात आला असून यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे.
पुढील महागाई भत्ता वाढ कधी ?
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 53 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात असून यामध्ये आणखी तीन टक्क्यांची वाढ होणार आहे. जानेवारी 2025 पासून महागाई भत्ता 56% होणार असा दावा केला जातो.
पण याबाबतचा निर्णय हा मार्च 2025 मध्ये होणाऱ्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत घेतला जाईल. दरवर्षी मार्च महिन्यातच महागाई भत्ता सुधारित करण्याबाबतचा निर्णय घेतला जातो आणि यानुसार यंदाही मार्च महिन्यातच जानेवारी महिन्यापासूनचा महागाई भत्ता वाढवला जाणार आहे.