7th Pay Commission : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत नवोदित फडणवीस सरकार सकारात्मक निर्णय घेऊ शकते असा दावा करण्यात आला आहे. सध्या राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे एवढे आहे.
अ, ब आणि क संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे आहे तर दुसरीकडे ड संवर्गात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष आहे. तसेच देशातील 25 राज्यांमध्येही कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सुद्धा 60 वर्षे आहे. त्यामुळे राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे झाले पाहिजे अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून सातत्याने उपस्थित केली जात आहे.
यासाठी सरकार दरबारी जोरदार पाठपुरावा देखील केला जातोय. मावळत्या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली होती. मात्र याबाबत सरकारने कोणताचं निर्णय घेतला नाही.
आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. अजित दादा आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत.
अशा परिस्थितीत महायुती सरकार राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढवून 60 वर्षे करण्याबाबतच्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेणार अशी आशा आता कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
महत्त्वाची बाब अशी की कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून नव्या सरकारकडे या संदर्भात पाठपुरावा देखील सुरू झाला आहे. राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून यासाठी पाठपुरावा सुरू झालाय.
यामुळे आता नवीन सरकार या संदर्भात सकारात्मक निर्णय घेणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे. खरे तर राज्यातील विविध संवर्गात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत. ही हजारोंच्या संख्येने रिक्त असणारी पदे एकाच वेळी भरता येणे अशक्य आहे.
यामुळे विद्यमान कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात जर वाढ केली गेली तर याचा फायदा सरकारलाच होणार आहे. रिटायरमेंट चे वय वाढवले गेले तर अनुभवी कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा सरकारला घेता येणे शक्य होणार आहे.
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याबाबत सकारात्मकता दाखवली होती. पण, आता देवेंद्र फडणवीस याबाबत काय विचार करतात आणि काय निर्णय घेतात हे पाहण्यासारखे ठरेल.