7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना 2023 मध्ये सोन्याचे दिवस येणार आहेत. येणाऱ्या नवीन वर्षात सातवा वेतन आयोग अंतर्गत दिल्या जाणाऱ्या वेतनामध्ये मोठी वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.
खरं पाहता केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसेच राज्य कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर एका आर्थिक वर्षात दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ अनुज्ञेय केला जातो. या अनुषंगाने यावर्षी जानेवारीमध्ये आणि जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे.
राज्य कर्मचाऱ्यांना मात्र जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता वाढ अनुज्ञेय करण्यात आली असली तरी देखील जुलै महिन्यापासूनची महागाई भत्ता वाढ अजून राज्य कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली नाही. केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै 2022 पासून 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळत असून येणाऱ्या नवीन वर्षात म्हणजेच येत्या जानेवारी महिन्यात महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणे अपेक्षित आहे.
निश्चितच महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना देखील जुलै महिन्यापासूनची तसेच नवीन जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता वाढ मिळणार आहे. एका मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या महागाईचा विचार केला असता आणि ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून अजून चार टक्के महागाई भत्ता वाढ मिळणार आहे. म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळू शकणार आहे.
तसेच पुढील वर्षात जुलै महिन्यात देखील महागाई भत्ता वाढेल अशा परिस्थितीत येणाऱ्या नवीन वर्षात सरकारी 46 ते 48% पर्यंत महागाई भत्ता वाढ मिळू शकते. दरम्यान काही जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% एवढा होईल त्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ केली जाणार आहे.
म्हणजेच महागाई भत्ता 50% झाले असता सरकारी कर्मचाऱ्यांना त्यानंतर शून्य टक्के महागाई भत्ता मिळेल, मात्र वेतनाशी संदर्भात असलेल्या फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ केली जाईल. सध्या कर्मचाऱ्यांना 2.57 पट एवढा फिटमेंट फॅक्टरचा लाभ दिला जात आहे. मात्र महागाई भत्ताने 50% चा पल्ला गाठल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना 3.68 पट या दराने फिटमेंट फॅक्टर मिळेल.
असं झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18000 वरून 26000 होईल आणि राज्य कर्मचाऱ्यांचे 15000 वरून 21000 होईल. निश्चितच येणारे नवीन वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांना अच्छे दिन आणून देणार आहे.