स्पेशल

7th Pay Commission : हिवाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार गोड बातमी ! शिंदे सरकार राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात करणार ‘इतकी’ वाढ

7th Pay Commission : राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच एक आनंदाची बातमी शिंदे सरकारकडून दिली जाणार आहे. एका मीडिया रिपोर्ट मध्ये केलेल्या दाव्यानुसार हिवाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतला जाणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच चार टक्के महागाई भत्ता वाढ मिळणार आहे. सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 34 टक्के दराने महागाई भत्ताचा लाभ दिला जात आहे.

आता यामध्ये चार टक्के वाढ होणार असून राज्य कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. खरं पाहता केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून चार टक्के महागाई भत्ता वाढ देण्यात आली आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाने महागाई भत्ता वाढीचा लाभ जुलै महिन्यापासून अनुज्ञेय केला आहे.

तसेच केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यापासून महागाई भत्ता वाढ रोखीने अदा करण्याबाबत तसेच महागाई भत्ता थकबाकी देखील कर्मचाऱ्यांना वर्ग करणे बाबत शासन निर्णय जारी केला होता. केंद्र शासनाच्या या शासन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता थकबाकी मिळाली असून महागाई भत्ता वाढीचा लाभ आता मिळू लागला आहे.

दरम्यान आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर लवकरच राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार असल्याचे बोलले जात असून येत्या काही दिवसात सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांना 4% वाढीव महागाई भत्ता लाभ दिला जाण्याचे शक्यता असून महागाई भत्ता वाढीचा लाभ हा जुलै महिन्यापासून अनुज्ञेय होणार आहे.

तसेच डीए एरियर्स मिळणार आहे. म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून ते जोवर महागाई भत्ता वाढ अनुज्ञेय होत नाही तोवर महागाई भत्ता थकबाकी देखील मिळणार आहे. याशिवाय येत्या हिवाळी अधिवेशनात जुनी पेन्शन योजनासारख्या कायम चर्चेमध्ये असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या मागणींवर विचार होणार आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागणीवर विस्तृत चर्चा होण्याची शक्यता असल्याचे मीडिया रिपोर्ट मध्ये नमूद केले जात आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts