7th Pay Commission : सरकारी कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्यासाठी मागणी करत आहेत. आता याबाबत एक महत्त्वाच अपडेट हाती आल आहे. मीडिया रिपोर्ट मध्ये केलेल्या दाव्यानुसार, सरकारी कर्मचाऱ्यांच्या या मागणीबाबत शासनाकडून लवकरच दखल घेतली जाणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाशी निगडित असलेल्या फिटमेंट फॅक्टर मध्ये लवकरच वाढ घडवून आणली जाणार आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी इथे नमूद करू इच्छितो की फिटमेंट फॅक्टर हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतना संदर्भात असतो.
यामध्ये वाढ झाल्यास मूळ वेतनात वाढ होते. अशा परिस्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांकडून फिटमेंट फॅक्टर वाढीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून मागणी लावून धरली जात आहे. आज आपण सरकारी कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ लागू केल्यास वेतनातं किती वाढ होते आणि नेमका फिटमेंट फॅक्टर वाढ कर्मचाऱ्यांना केव्हा लागू केली जाईल याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
फिटमेंट फॅक्टर बाबत महत्त्वाच अपडेट
सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाशी निगडित असलेल्या फिटमेंट फॅक्टरबाबत आताची सर्वात महत्त्वाची अपडेट अशी की, सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या मिळत असलेल्या 2.58 पट फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ होणार असून आता सरकारी कर्मचाऱ्यांना 3.68 पट फिटमेंट फॅक्टर लागू केला जाणार आहे. याबाबत कामगार युनियन कडून वारंवार मागणी केली जात आहे. यासाठी युनियन कडून सरकार दरबारी वारंवार निवेदने दिली जात आहेत. अशा परिस्थितीत शासनावर दबाव तयार होत आहे.
खरं पाहता फिटमेंट फॅक्टर वाढ ही महागाईशी निगडित असल्याचे जाणकार नमूद करतात. म्हणजेच ही वाढ महागाई भत्ता सोबत निगडित असून महागाई भत्ता वाढला की फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ होते. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 2.58 पट एवढा फिटमेंट फॅक्टर लागू आहे. यानुसार, केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना अठरा हजार रुपये मूळ वेतन मिळते तर महाराष्ट्र राज्य शासनातील राज्य कर्मचाऱ्यांना 15000 रुपये मूळ वेतन मिळते.
मात्र जर 3.68 पट एवढ फिटमेंट फॅक्टर झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना 26 हजार रुपये मिळून वेतन मिळणार आहे तर राज्य कर्मचाऱ्यांना 21 हजार रुपये एवढ मूळ वेतन मिळणार आहे. साहजिकच यामुळे केंद्रीय तसेच राज्य कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ होणार आहे आणि सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
नेमकी फिटमेंट फॅक्टर वाढ लागू केव्हा होईल
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. राज्य कर्मचाऱ्यांना देखील या हिवाळी अधिवेशनात महागाई भत्ता 38 टक्के दराने होण्याची शक्यता आहे. वाढत्या महागाईचा विचार केला असता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2023 मध्ये महागाई भत्ता 43 टक्के एवढा मिळणार आहे.
साहजिकच त्यावेळी देखील राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाणार आहे. जाणकार लोकांच्या मते ज्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% एवढा होईल यावेळी 3.68 पट फिटमेंट फॅक्टर लागू केला जाणार आहे. साहजिकच येत्या वर्षभरात सरकारी कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ होणार आहे.