7th Pay Commission : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी सरकारी कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन लागू व्हावा यासाठी सरकारकडे जोरदार पाठपुरावा करण्यात आला होता. त्यावेळी आठवा वेतन आयोगाच्या मोठ्या प्रमाणात चर्चा पाहायला मिळाल्यात.
मात्र लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्रातील सरकारने याबाबत कोणताच निर्णय घेतला नाही. सरकारने असा कोणताच प्रस्ताव सरकार दरबारी विचाराधीन नसल्याचे त्यावेळी स्पष्ट केले होते. दरम्यान आता पुढील वर्षी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात आठवा वेतन आयोग लागू होऊ शकतो अशा चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.
2025-26 च्या अर्थसंकल्पापूर्वी, 8 व्या वेतन आयोगाची चर्चा तीव्र झाली आहे कारण केंद्र सरकार दर 10 वर्षांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा करण्यासाठी नवीन वेतन आयोग स्थापन करत असते.
सध्याचा 7 वा वेतन आयोग फेब्रुवारी 2014 मध्ये स्थापन करण्यात आला होता, परंतु त्याच्या शिफारशी 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आल्या होत्या, ज्या 31 डिसेंबर 2025 रोजी संपणार आहेत, या आधारावर पुढील वेतन आयोगाची मागणी वाढू लागली आहे.
2025-26 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकार 8व्या वेतन आयोगाबाबत मोठा निर्णय घेऊ शकते, तर 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्यास किमान वेतन 34 हजार आणि पेन्शन 17 हजारांवर पोहोचू शकते. तथापि, या संदर्भात अद्याप कोणतेही अधिकृत विधान समोर आलेले नाही.
नवीन वेतन आयोगामध्ये, विविध आर्थिक मापदंड, विशेषत: महागाईनुसार सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्तीवेतन सुधारित केले जात असते. जर 8वा वेतन आयोग लागू झाला तर फिटमेंट फॅक्टरमध्येही बदल होऊ शकतो.
फिटमेंट फॅक्टर 2.57 वरून 2.86 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो, ज्यामुळे किमान पगारात 186 टक्के वाढ होईल. सध्या 7व्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर 2.57 आहे आणि मूळ वेतन 18000 आहे.
असे मानले जात आहे की, 8 व्या वेतन आयोगात मोदी सरकार फिटमेंट फॅक्टर 2.57 वरून 2.86% पर्यंत वाढवू शकते, यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 186 टक्क्यांनी वाढून 51,480 रुपये होईल आणि पेन्शनमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.
सध्याची पेन्शन 9,000 आहे पण नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर पेन्शनची ही रक्कम 25,740 पर्यंत वाढेल, तथापि, सरकारने याबाबत कोणतीच माहिती दिलेली नाही. यामुळे कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू कधी होणार आणि नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगारात किती वाढ होणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.