7th Pay Commission : देशातील एक कोटी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शन धारकांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे महागाई भत्ता वाढी संदर्भात. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढतो. पहिल्यांदा जानेवारी महिन्यापासून आणि दुसऱ्यांदा जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढवला जात असतो.
परंतु जानेवारी महिन्यापासून जो महागाई भत्ता वाढतो त्याचा निर्णय मार्च महिन्यात घेतला जातो आणि जुलै महिन्यापासून जो महागाई भत्ता वाढतो त्याचा निर्णय हा साधारणतः ऑक्टोबर महिन्यात होत असतो.
तथापि, महागाई भत्ता वाढ ही जानेवारी आणि जुलै महिन्यापासूनच होते. मार्च 2024 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्यात आला. ही वाढ जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आली.
आता या चालू महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर मध्ये पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार असून ही वाढ जुलै 2024 पासून लागू होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे जुलै 2024 पासूनच्या महागाई भत्ता वाढीच्या प्रस्तावावर केव्हा निर्णय होणार याची तारीखही समोर आली आहे.
किती वाढणार महागाई भत्ता?
यावेळी सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तसेच पेन्शन धारकांचा महागाई भत्ता हा तीन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता मिळतोय. मात्र यामध्ये तीन टक्क्यांची वाढ झाल्यास हा भत्ता 53% होईल.
अर्थातच जुलै 2024 पासून सरकारी कर्मचाऱ्यांना 53 टक्के महागाई भत्ता लागू होणार आहे. पण त्याचा रोख लाभ हा ऑक्टोबर महिन्याच्या पगारा सोबत मिळणार आहे. अर्थातच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कमही केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
निर्णय कधी होणार
मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर महागाई भत्ता 53% करण्याबाबतच्या प्रस्तावावर केंद्रातील मोदी सरकार 25 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.
म्हणजेच 25 ऑक्टोबरला केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53% करण्याबाबतचा शासन निर्णय केंद्र शासनाच्या माध्यमातून निर्गमित होण्याची शक्यता आहे.
जर 25 ऑक्टोबर पर्यंत याबाबतचा निर्णय झाला तर नक्कीच दिवाळीच्या आधीच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार आहे. या निर्णयामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी ही गोड होणार आहे.