7th Pay Commission : महागाई भत्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठे अपडेट समोर येत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्ता वाढीची भेट मिळणार आहे.
मीडिया रिपोर्ट नुसार, केंद्रातील मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दिवाळीच्या आधीच वाढवणार असल्याचे वृत्त हाती आले आहे. सध्या या सरकारी नोकरदार मंडळीला 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जातोय.
मार्च 2024 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून पन्नास टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जानेवारी 2024 पासून हा वाढीव भत्ता लागू करण्यात आला आहे. आता पुन्हा एकदा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच महागाई भत्ता 53% होणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रात येत्या काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा देखील महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर लगेचचं सुधारित केला जाईल असे म्हटले जात आहे. याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांच्या आणखी दोन महत्त्वाच्या मागण्या पूर्ण केल्या जाणार आहेत.
कर्मचाऱ्यांच्या कोणकोणत्या मागण्या पूर्ण होतील
मीडिया रिपोर्टनुसार कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर वाढवला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे दिवाळीच्या आसपासच हा फॅक्टर वाढवला जाईल असे बोलले जात आहे. सध्या सातवा वेतन आयोग अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना 2.57 पट या दराने फिटमेंट फॅक्टरचा लाभ मिळत आहे.
मात्र आता हा ट्रीटमेंट फॅक्टर 3.57 पट पर्यंत वाढवला जाणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा मूळ पगार वाढणार आहे. याशिवाय, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी आणि हाउसिंग बिल्डिंग ॲडव्हान्स 2017 नियमांनुसार, सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना बिनाव्याजी ॲडव्हान्स देण्यार अशी बातमी हाती आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना 34 महिन्यांच्या मूळ वेतनाएवढे कर्ज दिले जाणार आहे. ज्यावर सरकार कोणतेही व्याज आकारणार नाही. तसेच व्याज आकारण्याचा निर्णय घेतला तरी व्याजदर फारच कमी राहणार आहे.
हाउसिंग बिल्डिंग एडवांस अंतर्गत कर्मचाऱ्यांना जवळपास 25 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे. या कर्जासाठीचे व्याजदर हे सामान्य राहणार आहेत.