7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे महागाई भत्ता वाढ. पाचवा वेतन आयोगांतर्गत, सहावा वेतन आयोग अंतर्गत आणि सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो.
दरवर्षी जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढवला जात असतो. यानुसार नव्या वर्षात म्हणजेच 2025 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोनदा वाढणार आहे.
जानेवारी आणि जुलै मध्ये महागाई भत्ता वाढवला जाणार आहे. मात्र, पहिल्या सहामाहीतील महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय हा मार्च 2025 मध्ये आणि दुसऱ्या सहामाहीतील महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय हा ऑक्टोबर 2025 मध्ये घेतला जाईल.
दरम्यान, आता आपण जानेवारी महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नेमका कितीने वाढणार या संदर्भात सविस्तर अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
महागाई भत्ता कितीने वाढणार?
जानेवारीपासून जो महागाई भत्ता वाढणार आहे ती वाढ जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीमधील एलआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरेल. दरम्यान याच एआयसीपीआयची ऑक्टोबर महिन्यापर्यंतची आकडेवारी समोर आली असून नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांची आकडेवारी जाहीर होणे बाकी आहे.
या दोन महिन्यांचे आकडे समोर आलेत की प्रत्यक्षात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढणार हे समजू शकणार आहे. परंतु सध्याच्या आकडेवारीनुसार म्हणजेच ऑक्टोबर पर्यंतच्या जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा फक्त तीन टक्के वाढण्याची शक्यता आहे.
जुलैमध्ये ए आय सी पी आय चा निर्देशांक 142.7 अंकांवर होता, ज्यामुळे महागाई भत्त्याचा स्कोअर 53.64 टक्क्यांवर पोहोचला. ऑगस्टमध्ये निर्देशांक 142.6 अंक आणि DA 53.95% वर पोहोचला. सप्टेंबरमध्ये 143.3 अंकांच्या तुलनेत, महागाई भत्ता स्कोअर 54.49% होता.
त्याच वेळी, ऑक्टोबरच्या ताज्या आकडेवारीनुसार, निर्देशांक 144.5 अंकांवर पोहोचला आहे तर महागाई भत्ता 55.05 टक्क्यांवर पोहोचला आहे. म्हणजे महागाई भत्ता स्कोर 55% एवढाच आहे मात्र नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांची आकडेवारी जाहीर होणे बाकी आहे.
यामुळे हा महागाई भत्ता स्कोर 56 टक्क्यांवर जाणार आहे. एकंदरीत सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता लागू असून हा लाभ जुलै 2024 पासून मिळत आहे.
आता जानेवारी 2025 पासून महागाई भत्ता 56 टक्क्यांवर जाणार आहे. म्हणजेच महागाई भत्त्यात फक्त तीन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. मागच्या वेळी सुद्धा महागाई भत्ता फक्त तीन टक्क्यांनीच वाढला होता.