7th Pay Commission : केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारक गेल्या काही दिवसांपासून महागाई भत्ता वाढीची वाट पाहत आहेत. दरम्यान देशभरातील एक कोटी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे. खरंतर एआयसीपीआयच्या जानेवारी ते जून 2024 या कालावधीमधील आकडेवारीनुसार जुलै 2024 पासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढणार आहे.
अर्थातच हा भत्ता 53 टक्क्यांवर पोहोचणार आहे. जानेवारीपासून सरकारी कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जातोय. आधी हा भत्ता 46% एवढा होता. यामध्ये मार्च 2024 ला चार टक्के एवढी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली.
आता येत्या काही दिवसांनी केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत महागाई भत्ता 53 टक्के करण्याबाबतचा निर्णय होईल आणि ही वाढ जुलै महिन्यापासून लागू होणार आहे. साधारणपणे, केंद्र सरकार वर्षातून दोनदा म्हणजे जानेवारी आणि जुलैमध्ये DA अर्थातच महागाई भत्ता सुधारित करते, पण याची अधिकृत घोषणा नंतर केली जाते तसेच याचा रोख लाभ हा नंतर मिळतो.
मात्र ही वाढ जानेवारी आणि जुलै महिन्यापासूनच लागू होते. यामुळे जेव्हापासून याचा रोख लाभ मिळतो तेव्हापर्यंत महागाई भत्ता फरकाची रक्कमही मिळते. दरम्यान आता आपण जर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% झाला तर त्यांच्या पगारात किती वाढ होणार आणि महागाई भत्ता नेमका कसा मोजला जातो या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पगार कितीने वाढणार बरं ?
मोदी सरकारने कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढवला, तर ही DA वाढ टेक होम पगारात जोडली जाणार आहे. आता आपण केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढल्यानंतर त्यांचा पगार कितीने वाढणार यासंदर्भात माहिती पाहूया. सध्या ज्यांचा मूळ पगार 55,200 रुपये आहे त्यांना 50% दराने 27,600 रुपये एवढा महागाई भत्ता दिला जात आहे.
पण जेव्हा महागाई भत्ता 53 टक्के होईल तेव्हा त्यांचा महागाई भत्ता 29,256 रुपये होणार आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या पगारात २९,२५६ रुपये – २७,६०० रुपये = १,६५६ रुपये वाढ होणार आहे.
महागाई भत्ता कसा मोजला जातो?
महागाई भत्ता किती वाढेल हे CPI-IW म्हणजेच एआयसीपीआयच्या डेटावर अवलंबून असते. ही आकडेवारी कामगार मंत्रालयाकडून दर महिन्याला जाहीर केली जाते. या आकडेवारीच्या आधारे सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात किती वाढ करायची हे ठरवले जाते.
आता आपण याचा फॉर्म्युला नेमका कसा आहे हे पाहुयात. 7वा वेतन आयोग DA% = [{12 महिने AICPI-IW आकृती (आधारभूत वर्ष 2001=100) – 261.42}/261.42×100] असा हा फॉर्म्युला आहे.