7th Pay Commission News : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्ष सुरू होण्याआधीच एक आनंदाची बातमी हाती आली आहे. जर तुमच्याही कुटुंबात कोणी शासकीय सेवेत असेल किंवा तुमच्या मित्रपरिवारातून कोणी सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी लाखमोलाची ठरणार आहे.
खरेतर, दिवाळीपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ केली होती. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर डीए ५० वरून ५३ टक्के झाला आहे.
हा निर्णय ऑक्टोबर मध्ये घेण्यात आला असला तरी देखील जुलै 2024 पासून नवीन दर लागू झाला असल्याने जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरची थकबाकीही कर्मचाऱ्यांना देऊ करण्यात आली आहे. महागाई भत्ता वाढ आणि महागाई भत्ता फरकाची रक्कम ऑक्टोबर महिन्याच्या पगारांसोबतच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली.
यासह आता नवीन वर्षाच्या आधी केंद्र सरकारने काही कर्मचाऱ्यांच्या 2 भत्त्यात वाढ केली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार, जेव्हा महागाई भत्ता 50% ओलांडतो तेव्हा एचआरएसह इतर भत्ते वाढवावे लागतात.
या अंतर्गत, मागील काही महिन्यांत केंद्र सरकारच्या विविध विभागांनी 13 प्रमुख भत्त्यांमध्ये 25% वाढ केली होती. यामध्ये एचआरए, विशेष भत्ता, शिक्षण भत्ता आदी भत्त्यांचा समावेश होता. आता आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (MoH&FW) काही पात्र कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस भत्ता आणि नर्सिंग भत्ता वाढवला आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (MoH&FW) ड्रेस भत्ता आणि नर्सिंग भत्ता 25% ने वाढवला आहे. 50% डीए वाढीनंतर इतर भत्त्यांमध्ये वाढ करण्याचा एक भाग म्हणून मंत्रालयाने ही घोषणा केली आहे.
या दोन्ही भत्त्यांमधील दुरुस्तीचा लाभ केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांतर्गत असलेल्या सर्व रुग्णालयांना तसेच AIIMS नवी दिल्ली, PGIMER चंदीगड आणि JIPMER पाँडिचेरी या केंद्र सरकारच्या अनुदानित संस्थांना लागू होणार आहे.
अर्थातच या निर्णयाचा हजारो कर्मचाऱ्यांना फायदा होणार असून नववर्षाच्या आधीच या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी भेट ठरणार आहे. या निर्णयामुळे या संबंधित कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल असे म्हटले जात आहे.
हा निर्णय या संबंधित कर्मचाऱ्यांसाठी मोठा खास ठरणार असून शासनाच्या निर्णयाचे संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले आहे.