7th Pay Commission News : सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो. यानुसार 2024 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा दोनदा महागाई भत्ता वाढवण्यात आला. जानेवारी 2024 पासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% करण्यात आला होता आणि जुलै 2024 पासून महागाई भत्ता 50 टक्के झाला आहे.
यामुळे आता पुढल्या वर्षी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढणार याबाबत जाणून घेण्याची कर्मचाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. अशातच आता एआयसीपीआयची नवीन आकडेवारी समोर आली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरत असतो. जानेवारी 2025 पासून जो महागाई भत्ता वाढवला जाणार आहे त्याची आकडेवारी जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीमधील एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरणार आहे.
दरम्यान आता या एआयसीपीआयची हीच आकडेवारी समोर आली असून यातून आपण सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी 2025 पासून किती महागाई भत्ता वाढणार या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढणार?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आतापर्यंत एआयसीपीआयची जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2024 या महिन्यातील आकडे जाहीर करण्यात आले आहेत. या AICPI निर्देशांकनुसार, जुलैमध्ये हा आकडा 142.7 अंकांवर होता.
ज्यामुळे महागाई भत्त्याचा स्कोअर 53.64 टक्क्यांवर पोहोचला. ऑगस्टमध्ये निर्देशांक 142.6 अंक आणि DA 53.95% वर पोहोचला. सप्टेंबरमध्ये 143.3 अंकांच्या तुलनेत, भत्ता स्कोअर 54.49% होता.
त्याच वेळी, ऑक्टोबरच्या ताज्या आकडेवारीनुसार, निर्देशांक 144.5 अंकांवर पोहोचला आहे. महागाई भत्ता 55.05 टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांची आकडेवारी जाहीर होणे बाकी आहे.
या दोन महिन्यांची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्षात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढणार हे क्लिअर होणार आहे. मात्र सध्याची आकडेवारीचा ट्रेंड पाहता जानेवारी 2025 पासून देखील महागाई भत्ता तीन टक्क्यांनीच वाढणार आहे.
सध्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% एवढा असून यामध्ये आणखी तीन टक्क्यांची वाढ झाली तर हा भत्ता 56 टक्क्यांवर जाणार आहे. ही वाढ जानेवारी 2025 पासूनच लागू होणार आहे मात्र याचा निर्णय मार्च 2025 मध्ये होईल अशी आशा आहे.