7th Pay Commission News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयासंदर्भात. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र शासनाच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत सकारात्मक विचार केला जात आहे.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष एवढे आहे. मात्र आता यामध्ये वाढ करण्याचा निर्णय सरकार घेणार असल्याचे वृत्त हाती आले आहे.
खरंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून 60 वर्षे करण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सरकार दरबारी पाठपुरावा सुरू आहे.
विशेष म्हणजे राज्य शासनही याबाबत सकारात्मक आहे. परंतु अद्याप राज्य शासनाकडून या संदर्भात कोणताच ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. राज्य कर्मचाऱ्यांना फक्त आश्वासने दिली जात आहेत.
अशा या परिस्थितीतच केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय आणखी दोन वर्षांनी वाढणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. अर्थातच केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वय 60 वर्षांवरून 62 वर्षे केले जाऊ शकते असे बोलले जात आहे.
याबाबत केंद्रीय कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून सरकारकडे मागणी करण्यात आली असून या मागणीवर केंद्रातील सरकार सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे म्हटले जात आहे.
एवढेच नाही तर काही मीडिया रिपोर्ट मध्ये या संदर्भातील प्रस्ताव केंद्र शासनाच्या वित्त विभागाकडून तयार करण्यात आला असल्याचा दावाही होऊ लागला आहे. जर सरकारने असा निर्णय घेतला तर केंद्र सरकारच्या अधिनस्त असणाऱ्या 23 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
पण जर केंद्रातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षांवरून 62 वर्ष झाले तर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणारे कर्मचारी आणखी आक्रमक होणार आहेत. कारण की राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे अजून 60 वर्षे झालेले नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून राज्य कर्मचाऱ्यांचे वय 58 वर्षांवरून 60 वर्षे करण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे मात्र याला अजून यश आलेले नाही. पण आगामी काळात राज्य कर्मचाऱ्यांची मागणी देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे.