7th Pay Commission News : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवलाय. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% झाला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला असल्याने राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील वाढणे अपेक्षित आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 50 टक्क्यांवरून 53% केला जाणार आहे. मात्र याबाबतचा निर्णय कधी होणार हा मोठा प्रश्न राज्य कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात होता. दरम्यान, मीडिया रिपोर्ट्स मध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय पुढील महिन्यात म्हणजेच डिसेंबर 2024 मध्ये घेतला जाऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी येत्या 20 तारखेला मतदान होईल आणि त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यात नवीन सरकार स्थापन होणार आहे.
दरम्यान महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यानंतरच राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय घेतला जाईल आणि डिसेंबर महिन्याच्या पगारा सोबतच राज्य कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता दिला जाईल असे दिसते.
मात्र ही महागाई भत्ता वाढ जुलै 2024 पासून लागू राहणार असल्याने संबंधित राज्य कर्मचाऱ्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या पाच महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे. यासोबतच राज्य कर्मचाऱ्यांचा आणखी एक भत्ता वाढणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्ता देखील वाढवण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जाणार आहे.
त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल आणि नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच राज्य कर्मचाऱ्यांना मोठ्या दिलासा मिळणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सातवा वेतन आयोगाच्या तरतुदीनुसार, महागाई भत्ता 50 टक्के पेक्षा अधिक झाल्यास घरभाडे भत्तामध्ये सुधारणा करणे अपेक्षित आहे.
तर राज्य शासनांच्या वित्त विभाग मार्फत दि.05.02.2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निर्णयानुसार डी.ए चे दर हे 50 टक्के पेक्षा अधिक झाल्यास वास्तव्याच्या ठिकाणानुसार घर भाडे भत्ता हा 30 टक्के, 20 टक्के व 10 टक्के असा होणार आहे. सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 27 टक्के, 18 टक्के आणि नऊ टक्के या दराने घर भाडे भत्ता मिळतोय.