7th Pay Commission News : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवोदित फडणवीस सरकार मोठा निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे. खरे तर डिसेंबर महिन्याची येत्या दोन-तीन दिवसात सांगता होणार आहे.
त्यानंतर नवीन वर्षाला सुरुवात होणार असून नवीन वर्षात फडणवीस सरकार सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% करण्याचा निर्णय घेणार आहे. खरंतर ऑक्टोबर 2024 मध्ये केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53% करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयानंतर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 53% होणे अपेक्षित होते. पण, विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे आणि निकाल लागल्यानंतर सत्ता स्थापित करण्यासाठी सुरू झालेल्या गोंधळामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याबाबतचा प्रस्ताव मागे पडला.
मात्र, पुढील वर्षी अगदी सुरुवातीलाच याबाबतचा निर्णय होणे अपेक्षित आहे. फडणवीस सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार संपन्न झाला असल्याने नव्या वर्षात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर 50% वरून 53% केला जाणार आहे.
महत्त्वाची बाब अशी की ही महागाई भत्ता वाढ जुलै 2024 पासून लागू राहणार आहे. म्हणजेच याचा निर्णय हा नव्या वर्षात जरी होणार असला तरी देखील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू होणारा हा महागाई भत्ता जुलै 2024 पासून लागू राहील आणि यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे.
जानेवारी महिन्याच्या पगारासोबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आणि याच पगारांसोबत महागाई भत्ता फरकाचा सुद्धा लाभ दिला जाणार आहे.
जानेवारी महिन्यात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई पत्ता 50 टक्क्यांवरून 53% करण्याबाबतच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता मीडिया रिपोर्ट मध्ये वर्तवली जात आहे. यामुळे आता फडणवीस सरकार याबाबतचा निर्णय नेमका कधीपर्यंत घेणार हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.