7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षी 38 टक्के दराने महागाई भत्ता वाढीचा लाभ अनुज्ञेय करण्यात आला आहे. खरं पाहता सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातो. पहिल्यांदा जानेवारी महिन्यापासून आणि दुसऱ्यांदा जुलै महिन्यापासून हा डीएवाढीचा लाभ दिला जातो.
अर्थातच आता जानेवारी महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ मिळणार आहे. खरं पाहता महागाई भत्ता वाढ अनुज्ञेय करण्यासाठी एआयसीपीआयचे इंडेक्स विचारात घेतले जातात. आता या इंडेक्सचे आकडे हे दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला जाहीर होत असतात.
जानेवारी महिन्यापासून जो महागाई भत्ता वाढ अनुज्ञेय केली जाणार आहे त्यासाठी 31 जानेवारी रोजी जे डिसेंबर 2022 मधील एआयसीपीआयचे इंडेक्समधील आकडे प्रदर्शित होतील त्या आधारे महागाई भत्ता वाढ ही फिक्स होणार आहे. म्हणजेचं केंद्रीय कर्मचाऱ्यांना 31 जानेवारी रोजी महागाई भत्ता किती वाढणार हे समजणार आहे.
म्हणजेच 31 जानेवारी नंतर महागाई भत्ता वाढ निश्चित होणार आहे. कामगार मंत्रालय 2023 च्या पहिल्या सहामाहिचा म्हणजे जानेवारी ते जूनचा महागाई भत्ता मार्च 2023 मध्ये जाहीर होणार आहे. दरम्यान आता किती टक्के महागाई भत्ता वाढ होईल हे जानेवारी अखेर समजणार असल्याने कर्मचाऱ्यांचे याकडे लक्ष लागून आहे.
खरं पाहता, एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार महागाई भत्ता ठरत असतो. आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यातली आकडेवारी समोर आली असून नोव्हेंबर मध्ये 132.5 एवढा निर्देशांक क्रमांक राहिला आहे. जर डिसेंबर मध्ये देखील ही आकडेवारी कायम राहिली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केवळ तीन टक्के वाढ होणार आहे.
मात्र जर यामध्ये वाढ झाली अन निर्देशांक 133.5 वर गेलेत तर मात्र DA चार टक्क्यांनी वाढणार आहे. म्हणजेच सद्यस्थितीत असलेले निर्देशांक कायम असले तर 2023 च्या पहिल्या सहामाहीत तरकारी कर्मचाऱ्यांना तीन टक्के वाढ म्हणजेच ते 41% DA लागू होईल. पण निर्देशांकात एक टक्का वाढ झाली तर 42 टक्के महागाई भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होईल. यामुळे आता सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष एआयसीपीआयच्या इंडेक्सकडे लागून आहे.
किती वाढेल पगार
आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, सरकारी कर्मचाऱ्यांना जर 41 टक्के महागाई भत्ता लागू झाला तर 18,000 बेसिक पगार असलेल्या व्यक्तीला दर महिना 7 हजार 380 रुपये महागाई भत्ता मिळेल. एकंदरीत सध्या मिळत असलेल्या महागाई भत्त्यात 540 रुपयाची वाढ होईल.
कधी जारी केला जाईल वाढीव महागाई भत्ता लाभं
या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की, 31 जानेवारी रोजी कर्मचाऱ्यांना किती महागाई भत्ता वाढू शकतो हे निश्चित होणार आहे मात्र ही महागाई भत्ता वाढ मार्च महिन्यात कर्मचाऱ्यांना रोखीने अदा केली जाणार आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार एक मार्च 2023 रोजी एका कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेतला जाणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यानची महागाई भत्ता थकबाकी देखील अनुज्ञय केली जाणार आहे. यानंतर महाराष्ट्र शासनातील राज्य कर्मचाऱ्यांना देखील या महागाई भत्ता वाढीचा लाभ अनुज्ञय होईल.