7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी हाती येत आहे. ही बातमी सरकारी कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या महागाई भत्ता वाढीबाबत आहे. महागाई भत्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आता तो सुवर्णक्षण लवकरच येणार आहे.
सरकार पुढील महिन्यात अर्थातच सप्टेंबर मध्ये महागाई भत्ता वाढीची घोषणा करू शकते. सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीची भेट मिळते. जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित केला जात असतो.
जानेवारी महिन्यापासून चा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय मार्च 2024 मध्ये घेण्यात आला होता. दरम्यान आता जुलै महिन्यापासून चा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय केंद्रातील सरकार सप्टेंबर मध्ये घेईल असे वृत्त हाती आले आहे.
मीडिया रिपोर्ट वर जर विश्वास ठेवला तर 25 सप्टेंबर 2024 ला केंद्रातील मोदी सरकार केंद्रीय कॅबिनेटची एक महत्वाची बैठक आयोजित करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.
याच केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतच्या प्रस्तावाला हिरवा झेंडा दाखवला जाईल असे म्हटले जात आहे.
तथापि, यासंदर्भात कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही. पण सरकार दरवर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय घेत असते.
आत्तापर्यंत असाच अनुभव आला आहे. यामुळे यावेळी देखील सरकार हाच ट्रेंड फॉलो करेल आणि सप्टेंबरच्या शेवटी महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय घेईल ही शक्यता नाकारून चालत नाही.
किती वाढणार महागाई भत्ता?
जानेवारी ते जून 2024 या कालावधीमधील एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार जुलै 2024 पासून महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवू शकतो. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जातोय.
यामध्ये आता तीन टक्क्यांची वाढ होईल म्हणजेच जुलैपासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% होईल. याचा रोख लाभ हा सप्टेंबर महिन्याच्या पगारांसोबत म्हणजेच जो पगार कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्यात मिळेल त्यासोबत दिला जाईल.
महत्त्वाचे म्हणजे महागाई भत्ता फरकाची रक्कमही या पगारासोबत मिळणार आहे. यामुळे दिवाळीच्या आधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार असे दिसत आहे.