7th Pay Commission : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी उद्या अर्थातच 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यानंतर 23 नोव्हेंबरला मतमोजणीची प्रक्रिया होईल. दरम्यान, याच मतमोजणीच्या दिवशी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार की महायुतीचे हे क्लियर होणार आहे. अशातच महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे.
खरे तर केंद्रातील मोदी सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतलाय. आधी केंद्रिय कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता मात्र हा महागाई भत्ता 53% झाला आहे. ही वाढ जुलै 2024 पासून लागू करण्यात आली आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली असल्याने राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील आता महागाई भत्ता वाढ लागू होणे अपेक्षित आहे. खरे तर सध्या राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता सुरू असून आचारसंहिता काळात सरकारकडून राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढी संदर्भात निर्णय होणे अशक्य आहे.
याचमुळे केंद्रातील केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढलेला असतानाही राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय होऊ शकला नाही. पण नवीन सरकार राज्यात आल्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर 53% केला जाणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार डिसेंबर महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53% करणे बाबतचा निर्णय घेतला जाईल. ही वाढ जुलै 2024 पासून लागू होईल. अर्थातच डिसेंबर महिन्याच्या पगारांसोबत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील दिली जाणार आहे.
यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. डिसेंबर चा पगार हा जानेवारी महिन्यात मिळेल आणि याच पगारासोबत सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्याचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळणार आहे.
यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्षाची सुरुवात फारच चांगली राहणार असून महागाई भत्ता वाढीचा या संबंधित कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार अशी आशा या निमित्ताने व्यक्त होऊ लागली आहे. डिसेंबर महिन्यात याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे मात्र, यासंदर्भात कोणतेच अधिकृत माहिती हाती आलेली नाही.
यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय नेमका कधी होणार, नवीन सरकार आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये याबाबतचा निर्णय घेतला जाईल का? ही गोष्ट विशेष पाहण्यासारखी ठरणार आहे.