7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीच्या आधीच एक मोठी भेट मिळण्याची शक्यता तयार होत आहे. खरे तर सध्या संपूर्ण देशात नवरात्र उत्सवाची मोठी धूम सुरू आहे. येत्या काही दिवसांनी विजयादशमी अर्थातच दसऱ्याचा सण साजरा होणार आहे. त्यानंतर मग मोठ्या उत्साहात दिवाळीचा आनंददायी पर्व सेलिब्रेट केला जाईल.
मात्र दसरा आणि दिवाळी सणाच्या आधीच सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्रातील मोदी सरकार मोठी भेट देणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज केंद्रीय कॅबिनेटची एक महत्त्वाची बैठक संपन्न होत असून या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा महागाई भत्ता वाढीबाबतच्या विषयावर सकारात्मक विचार होणार आहे.
या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जाणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता मिळतोय. जानेवारी 2024 पासून त्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता मिळत असून लवकरच हा भत्ता 53% होणार आहे.
म्हणजेच महागाई भत्ता यावेळी तीन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. खरे तर गेल्या वेळी महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्यात आला होता. मात्र यावेळी एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार हा भत्ता फक्त तीन टक्क्यांनी वाढणार आहे.
यानुसार महागाई भत्ता 53% होईल आणि याचा रोख लाभ हा ऑक्टोबर महिन्याचा पगारांसोबत मिळणार आहे. परंतु ही वाढ जुलै महिन्यापासून लागू राहणार आहे. यामुळे सदर नोकरदार मंडळीला जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे.
यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा दसरा आणि दिवाळीचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात संपन्न होईल अशी आशा या निमित्ताने व्यक्त होऊ लागली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढल्यानंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत रुजू असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढवला जाणार आहे.
राज्य कर्मचाऱ्यांना सध्या 50% दराने महागाई भत्ता मिळतोय मात्र जेव्हा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% होईल त्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा केंद्र कर्मचाऱ्यांप्रमाणेच केला जाणार आहे.
तथापि आज होणाऱ्या केंद्र कॅबिनेटच्या बैठकीत या संदर्भातील निर्णय होईलच या संदर्भात अजून तरी अधिकृत माहिती हाती आलेली नाही. परंतु आगामी दसरा आणि दिवाळीचा सण पाहता आज याबाबतचा निर्णय होऊ शकतो असे मत काही जाणकारांनी व्यक्त केले आहे.