स्पेशल

नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट ! महागाई भत्ता 3% वाढणार की 4%, समोर आली मोठी अपडेट

7th Pay Commission : नवीन वर्षात केंद्र सरकार सरकारी कर्मचाऱ्यांबाबत मोठा निर्णय घेणार आहे. कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच मोठी भेट दिली जाईल. सरकार जानेवारी महिन्यापासूनचा महागाई भत्ता (DA) वाढवण्याबाबत मोठी घोषणा करू शकते, असा दावा करण्यात आला आहे.

वृत्तानुसार, मार्च 2025 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा वाढवला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 53 टक्के दराने महागाई भत्ता मिळतोय.

मागील महागाई भत्ता वाढ तीन टक्क्यांनी झाली होती. यामुळे आता पुढील महागाई भत्ता वाढ नेमकी किती टक्क्यांनी होणार. यावेळी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA 3 टक्क्यांनी वाढवणार की 4 टक्क्यांनी हा प्रश्न उपस्थित होतोय.

खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांची महागाई भत्ता वाढ एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरत असते. जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या दरम्यानच्या एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता सुधारित केला जाणार आहे.

डीएमधील ही वाढ १ जानेवारी २०२५ पासून प्रभावी राहील मात्र, मागील वर्षांतील रेकॉर्ड पाहिल्यास, सरकार मार्चमध्ये डीए वाढवण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. सरकार मार्च मध्ये कधीही डीए वाढीची घोषणा करू शकते, परंतु ही वाढ 1 जानेवारीपासूनच प्रभावी मानली जाईल. सरकार वर्षातून दोनदा १ जानेवारी आणि १ जुलैपासून डीए वाढवते.

महागाई भत्ता किती वाढणार ?

एआयसीपीआयची ऑक्टोबर 2024 पर्यंत ची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 56 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. अजून नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांच्या आकडेवारी येणे बाकी आहे.

मात्र महागाई भत्त्याच्या दरात यामुळे मोठा काही फरक पडणार नाही. म्हणजेच डिसेंबर महिन्याची आकडेवारी जाहीर झाल्यानंतरही महागाई भत्त्याचे दर 56 टक्क्यांच्या आसपासच राहणार आहेत.

अर्थातच जानेवारी 2025 पासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणखी तीन टक्क्यांनी वाढणार आहे. म्हणजेच हा महागाई भत्ता 56 टक्क्यांवर जाईल. दुसरीकडे जानेवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% होईल असा अंदाज आहे.

मात्र ही वाढ जुलै 2024 पासून लागू राहणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आणि त्यानंतरच्या सत्ता स्थापनेच्या विलंबामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांची महागाई भत्ता वाढ रखडली आहे. पण, आता राज्य सरकार लवकरच याबाबतचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts