7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता संदर्भात. खरंतर, राज्य कर्मचारी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महागाई भत्ता वाढीची वाट पाहत आहेत.
सध्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% इतका असून यामध्ये आणखी तीन टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित आहे. दरम्यान, आता याच संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मंडळी केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै 2024 पासून 53% एवढा केला आहे.
याबाबतचा निर्णय हा ऑक्टोबर 2024 मध्ये झालाय पण ही महागाई भत्ता वाढ जुलै 2024 पासून लागू करण्यात आली होती. आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 50 टक्के एवढाच होता. यानुसार आता राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 50% वरून 53% होणे अपेक्षित आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील जुलै महिन्यापासूनच ही वाढ लागू होणे अपेक्षित आहे. म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून 53% दराने महागाई भत्ता चा लाभ मिळणार आहे.
पण याबाबतचा निर्णय हा जानेवारी महिन्याच्या अखेरीस घेतला जाईल आणि जानेवारी महिन्याच्या पगारासोबतच राज्य कर्मचाऱ्यांना 53% दराने डीएवाढीचा आणि महागाई भत्ता थकबाकीचा लाभ मिळेल असे बोलले जात आहे. येत्या काही दिवसांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न होईल आणि या बैठकीत याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नक्कीच फडणवीस सरकारने लवकरच आपल्या मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करून याबाबतचा निर्णय घेतला तर राज्य कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी भेट ठरणार आहे. उद्या मकर संक्रांतीचा पर्व साजरा केला जाईल अन अशा परिस्थितीत जर निर्णय झाला तर नक्कीच ही राज्य कर्मचाऱ्यांसाठी मकर संक्रांतीचीचं भेट ठरणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सरकारने जर येत्या काही दिवसात याबाबतचा निर्णय घेतला तर राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 3 टक्के डीए वाढीचा लाभ अन जुलै ते डिसेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीमधील महागाई भत्ता थकबाकीचा लाभ जानेवारी पेड इन फेब्रुवारी वेतन अन पेन्शन देयकासोबत देण्यात येणार आहे.