स्पेशल

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! आठवा वेतन आयोगाबाबत समोर आली मोठी अपडेट, कधी लागू होणार नवीन वेतन आयोग ?

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा नवीन वेतन आयोगाबाबत. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग अंतर्गत पगार दिला जात आहे. सातवा वेतन आयोग 2016 मध्ये लागू झाला आहे. खरे तर पहिला वेतन आयोग 1947 मध्ये लागू झाला आणि त्यानंतर दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जात आहे.

यामुळे आठवा वेतन आयोग 2026 पर्यंत लागू होणे अपेक्षित आहे. दरम्यान आठवा वेतन आयोगा संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे नवीन आठवा वेतन आयोग लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर केल्यानंतर लागू होऊ शकतो.

खरे तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेमध्ये अनेक सदस्यांनी आठवा वेतन आयोग संदर्भात प्रश्न उपस्थित केले होते. त्यावेळी मात्र सरकारच्या माध्यमातून आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा कोणताच प्रस्ताव सरकार दरबारी विचाराधीन नसल्याचे म्हटले गेले होते.

स्वतः अर्थमंत्री आणि अर्थराज्यमंत्री यांनी ही माहिती दिली होती. आता मात्र निवडणुका पूर्ण झाल्यानंतर जे नवीन सरकार सत्तेत येईल ते नवीन सरकार आठवा वेतन आयोग स्थापित करणार असा दावा होऊ लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आठवा वेतन आयोगासाठीच्या समितीची स्थापना या वर्षातच केली जाणे अपेक्षित आहे. यामुळे आता जें नवीन सरकार सत्तेत येईल ते नवीन सरकार आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी कारवाई करेल असे म्हटले जात आहे.

याबाबत कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी देखील काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये नवीन सरकार आठवा वेतन आयोग लागू करणार असा दावा केला जात आहे. निश्चितच जर आठवा वेतन आयोग लागू झाला तर सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.

वेतन आयोगाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला असता तर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत आला आहे. पाचवा वेतन आयोगाबाबत बोलायचं झालं तर हा वेतन आयोग 1997 साली लागु झाला.

सहावा वेतन आयोग हा 2006 साली आणि सातवा वेतन आयोग सन 2016 ला लागू झाला आहे. म्हणजेच प्रत्येक वेतन आयोगांमध्ये 10 वर्षांचा कालावधी पाहायला मिळाला आहे. त्यामुळे आता या ट्रेंडनुसार सन 2026 मध्ये आठवा वेतन आयोग लागु होणे अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे.

तथापि यासंदर्भात कोणतीच अधिकृत माहिती समोर आली नसल्याने खरंच नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी कारवाई करणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

पगारात होणार मोठी वाढ

आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर फिटमेंट फॅक्टर वाढणार आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 2.57 फिटमेंट फॅक्टरने पगार मिळत आहे. मात्र आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर 3.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे पगार मिळणार आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात किमान 8000 रुपयांची वाढ होणार आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts