8th Pay Commission : भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्याचा मोठा निर्णय घेतला. सदर महागाई भत्ता वाढ मात्र जानेवारी 2024 पासून लागू राहील असे यावेळी केंद्रातील सरकारने स्पष्ट केले. अर्थातच जानेवारी ते जून 2024 या कालावधीसाठी ही महागाई भत्ता वाढ लागू राहणार आहे.
याचा रोख लाभ मात्र या चालू महिन्याच्या वेतनासोबत अर्थातच मार्च महिन्याच्या वेतनासोबत दिला जाणार आहे. यासोबत जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील मिळणार आहे. शिवाय महागाई भत्ता आता 50 टक्क्यांवर पोहोचला असल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्ता देखील एक टक्क्यांपासून ते तीन टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.
विशेष म्हणजे वाढीव घर भाडे भत्त्याचा देखील लाभ मार्च महिन्याच्या पगारासोबतच दिला जाणार आहे. खरंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकांसाठीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच सरकार आठवा वेतन आयोगाबाबत काहीतरी सकारात्मक निर्णय घेणार असे वाटत होते. मात्र वर्तमान सरकारने याबाबतचा कोणताच निर्णय घेतला नाही.
निवडणुकीचे वर्ष असताना देखील आठवा वेतन आयोगाबाबत सरकारने कोणतेच पाऊल उचलले नाही. वास्तविक, सध्याचा सातवा वेतन आयोग हा 2016 मध्ये लागू करण्यात आला होता. वेतन आयोगाचा आत्तापर्यंतचा ट्रेंड पाहिला असता तर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत असतो.
याचाच अर्थ नवीन आठवा वेतन आयोग हा 2026 पर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी बहाल केला जाणे अपेक्षित आहे. मात्र, यासाठीच्या समितीची स्थापना ही 2024 मध्ये होणे गरजेचे आहे. कारण की, जेव्हा 2016 मध्ये सातवा वेतन आयोग लागू झाला होता त्यावेळी 2014 साली याची समिती स्थापित झाली होती.
यामुळे 2026 मध्ये नवीन वेतन आयोग अर्थातच आठवा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी याची समिती 2024 मध्येच स्थापित होणे आवश्यक आहे. अशातच आता मीडिया रिपोर्ट मध्ये पुन्हा एकदा आठवा वेतन आयोगाबाबत मोठा दावा केला जाऊ लागला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार लोकसभा निवडणूका झाल्यानंतर केंद्रात येणारे नवीन सरकार आठवा वेतन आयोगाबाबत सकारात्मक निर्णय घेऊ शकते. नवीन वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत सरकारने अद्याप चर्चा केलेली नाही. पण, यंदा सरकार त्यांना मोठी भेट देऊ शकते, अशी अपेक्षा आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 7 व्या वेतन आयोगाचा कालावधी आता संपत आहे.लवकरच त्यांच्यासाठी नवीन वेतन आयोग स्थापन करण्यात येणार असून यामुळे त्यांच्या पगारात सुधारणा होणार आहे. कर्मचारी संघटनेच्या सततच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आठवा वेतन आयोगाची फाईल तयार केली जाणार आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी कधी होणार, याची कोणतीही मुदत सांगितली गेली नाही. त्याचबरोबर याबाबत सरकारकडून कोणतीही औपचारिक माहिती देण्यात आलेली नाही.
पण असे झाले तर कर्मचाऱ्यांसाठी खरोखरच ही आनंदाची बातमी राहणार आहे. महागाई भत्त्यात सातत्याने ४ टक्के वाढ केल्यानंतर आता वेतन सुधारित करण्याची वेळ आली आहे. कामगार संघटनेच्या वाढत्या दबावामुळे सरकार त्यांना खुश करण्यासाठी आठवा वेतन आयोगाबाबत सकारात्मक निर्णय घेणार असा दावा केला जात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पुढील वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत सरकार निर्णय घेऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.
आतापर्यंत 8 वा वेतन आयोग येणार नाही अशी चर्चा होती. पण, आता सातव्या वेतन आयोगानंतर पुढील वेतन आयोगाची तयारी सुरू होणार अशी शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. मात्र, सरकारकडून याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. परंतु, कर्मचाऱ्यांच्या सततच्या मागण्यांमुळे सरकार पुढील वेतन आयोगाचा विचार करू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.