8th Pay Commission:- केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये चार टक्के महागाई भत्तावाढीचा लाभ मिळण्याची दाट शक्यता असून त्यासोबत घरभाडे भत्ता देखील वाढण्याची शक्यता आहे. सध्या कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन, महागाई भत्ता आणि इतर महत्त्वाचे लाभ हे प्रामुख्याने सातवा वेतन आयोगानुसार दिले जातात. आपल्याला माहित असेलच की वेतन आयोग हे दर दहा वर्षातून एकदा आणला जातो. साधारणपणे सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी 2016 पासून लागू करण्यात आलेले आहेत.
त्या पार्श्वभूमीवर आठवा वेतन आयोग कधी लागू होईल? याबाबतची कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा आहे. या पार्श्वभूमीवर आठवा वेतन आयोगाबाबत एक मोठी अपडेट सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. बऱ्याच दिवसांपासून अनेक मीडिया रिपोर्ट मध्ये यासंबंधीच्या बातम्या वाचायला येत होत्या. यावरून आठवा वेतन आयोग सरकारच्या माध्यमातून लवकरच लागू केला जाईल अशी शक्यता दिसत होती. परंतु या पार्श्वभूमीवर देशाचे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेमध्ये या संदर्भातील स्थिती स्पष्ट करून यासंबंधीचा संभ्रम दूर केला.
राज्यसभेत काय म्हटले पंकज चौधरी?
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी याबाबत राज्यसभेमध्ये स्पष्टीकरण देताना म्हटले की, वेतन आयोग हा साधारणपणे दहा वर्षातून एकदा आणला जातो. त्यामुळे सध्या तरी दहा वर्ष होण्याअगोदर आठवा वेतन आयोग
आणण्याची कोणतीही योजना सरकारची नाही. विशेष म्हणजे ही स्थिती केंद्र सरकारच्या माध्यमातून या अगोदर देखील स्पष्ट करण्यात आलेली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीकरिता त्यांच्या कामगिरीवर आधारित म्हणजेच परफॉर्मन्सवर आधारित प्रणाली आणण्याचा विचार सरकार करत आहे.या प्रणालीच्या आधारे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा परफॉर्मन्स कसा आहे यानुसार रेटिंग दिले जाईल व त्या आधारावर त्यांचा पगार वाढवला जाईल. तसेच सातव्या वेतन आयोगाच्या ज्या काही शिफारसी आहेत त्यानुसार केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना जे काही वेतन व भत्ते तसेच मिळणाऱ्या पेन्शनच्या रचनेमध्ये बदल करण्यासाठी नवीन आयोग स्थापन करण्याची गरज नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. तसेच कर्मचाऱ्यांना मिळणारे भत्ते आणि पगाराचा आढावा हा प्रामुख्याने आयक्रोएड फार्मूलाच्या आधारे घेतला जाण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली.