स्पेशल

सरकारी कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोगासाठी आणखी वाट पाहावी लागणार, कुठंपर्यंत पोहचलय 8th Pay Commission चे काम ? सरकारने सर्वच सांगितलं

8th Pay Commission : तुम्हीही सरकारी कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्र परिवारातून कोणी शासकीय सेवेत असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. खरंतर गेल्या काही महिन्यांपासून आठवा वेतन आयोगाबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आठवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी जोर धरत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधी या मागणीने सर्वात जास्त जोर पकडला होता. लोकसभा निवडणुकीचा काळ पाहता सरकारी कर्मचाऱ्यांची ही मागणी पूर्ण होऊ शकते असे वाटतही होते. मात्र सरकारने लोकसभा निवडणूक असतानाही सरकारी कर्मचाऱ्यांची ही मागणी पूर्ण केली नाही.

त्यामुळे सदर नोकरदार मंडळीचा मोठा हिरमोड झाला. यानंतर देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपा प्रणित एनडीए आघाडीने सरकार स्थापित केले. दरम्यान मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर आता पुन्हा एकदा या मागणीने जोर पकडला आहे.

नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधीचं यासाठी केंद्राकडे पाठपुरावा देखील करण्यात आला होता. दरम्यान आता आठवा वेतन आयोगासंदर्भात केंद्रातील सरकारने तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर आपली भूमिका क्लिअर केली आहे. नवीन वेतन आयोग लागू करण्याची प्रक्रिया कुठे पर्यंत पोहोचली आहे या संदर्भात सरकारने मोठी माहिती दिली आहे. 

आठव्या वेतन आयोगासाठी वाट पाहावी लागणार ?

नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यसभेत आठवा वेतन आयोगा संदर्भात एक लेखी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या प्रश्नाच्या उत्तरात केंद्रातील सरकारने मोठी माहिती दिली आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत सरकारच्या वतीने या प्रश्नाला उत्तर दिले आहे.

त्यांनी सांगितल्याप्रमाणे, जून २०२४ मध्ये आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी दोन विनंत्या प्राप्त झाल्या आहेत. पण, सध्या असा कोणताही प्रस्ताव केंद्रातील मोदी सरकारकडे विचाराधीन नाहीये.

एकंदरीत सध्या आठवा वेतन आयोगाचा कोणताच प्रस्ताव सरकारकडे विचाराधीन नाहीये. त्यामुळे नवीन वेतन आयोगासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

8 वा वेतन आयोग कधी लागू होऊ शकतो ?

नवीन आठवा वेतन आयोग कधी लागू करायचा याबाबतचा निर्णय केंद्रातील सरकार घेणार आहे. पण आत्तापर्यंतचा ट्रेंड पाहिला तर प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू झाला आहे. सध्याचा सातवा वेतन आयोग हा 2014 मध्ये स्थापन झाला होता. फेब्रुवारी 2014 मध्ये सातव्या वेतन आयोगाची स्थापना झाली आणि जानेवारी 2016 मध्ये हा आयोग लागू झाला.

यानुसार जर विचार केला तर 2024 मध्ये आठव्या वेतन आयोगाची स्थापना होणे अपेक्षित आहे आणि जानेवारी 2026 मध्ये नवीन आठवा वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांना बहाल करणे अपेक्षित आहे. दरम्यान, जर नवीन वेतन आयोग लागू झाला तर याचा फायदा एक कोटी कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे.

यामुळे फिटमेंट फॅक्टर वाढणार असून पगारात भरीव वाढ होणार आहे. सध्या 2.57 पट असा फिटमेंट फॅक्टर लागू आहे मात्र हा 3.68 पट होऊ शकतो असा दावा केला जात आहे. असे झाले तर कर्मचाऱ्यांच्या पगारात आठ हजाराची वाढ होणार आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार 26,000 वर जाणार आहे. 

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts