8th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर नुकत्याच सहा महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका संपन्न झाल्यात. यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक देखील नुकतीचं संपन्न झाली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी आठवा वेतन आयोगाचा मुद्दा चर्चेत आला होता. सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने आठवा वेतन आयोगाची लवकरात लवकर घोषणा करावी अशी मागणी केली जात आहे.
यासाठी सरकारी कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून शासन दरबारी जोरदार पाठपुरावा देखील सुरू आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की आत्तापर्यंतच्या वेतन आयोगाच्या इतिहासात कर्मचाऱ्यांना दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत आला आहे. पहिला वेतन आयोग हा 1946 मध्ये लागू झाला आणि सध्याचा सातवा वेतन आयोग हा 2016 मध्ये लागू झाला आहे.
म्हणजेच नवीन आठवा वेतन आयोग हा 2026 मध्ये लागू होणे अपेक्षित आहे. 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू झाला असल्याने एक जानेवारी 2026 पासून आठवावेतन आयोग लागू होईल अशी शक्यता मीडिया रिपोर्टमध्ये वर्तवली जात आहे. खरे तर सातवा वेतन आयोग प्रत्यक्षात सरकारी कर्मचाऱ्यांना बहाल करण्यापूर्वी त्याची स्थापना करण्यात आली होती.
सातवा वेतन आयोगाची स्थापना ही 2014 मध्ये झाली होती यानुसार आठवा वेतन आयोगाची स्थापना देखील लवकरच होणार असे बोलले जात आहे. काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये पुढील वर्षी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात आठवावेतन आयोगाबाबत अधिकृत घोषणा केली जाईल असा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार या संदर्भात देखील नवीन अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल 186 टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
नॅशनल कौन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी (जेसीएम) चे सचिव (स्टाफ साइड) शिव गोपाल मिश्रा यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. मिश्रा यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांना किमान २.८६ च्या फिटमेंट फॅक्टरची अपेक्षा आहे. ७ व्या वेतन आयोगानुसार २.५७ फिटमेंट फॅक्टरच्या तुलनेत हे २९ बेसिस पॉइंट्सने (bps) अधिक आहे.
जर का फिटमेंट फॅक्टर वाढले तर कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनात वाढ होते. तसेच कर्मचाऱ्यांची पेन्शन आणि पगार असे दोन्हीमध्येही वाढ होते. जर समजा केंद्र सरकारने फिटमेंट फॅक्टर 2.57 पटीवरून २.८६ पट करण्यास मंजुरी दिली तर सध्याच्या १८ हजार रुपयांच्या वेतनाच्या तुलनेत सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन वाढून ५१,४८० रुपयांवर पोहोचणार आहे.
तर पेन्शन सुद्धा वाढेल, सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पेन्शन ही सध्याच्या ९ हजार रुपयांवरून थेट 25 हजार 740 रुपये होणार आहे. म्हणजेच यामध्ये १८६ टक्क्यांची वाढ होणार आहे. तथापि आठवा वेतन आयोग कधी स्थापित होणार आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका कितीने वाढणार याबाबत कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही.