स्पेशल

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! आठवा वेतन आयोग कधीपर्यंत लागू होणार ? अर्थ मंत्रालयाने दिली मोठी माहिती

8th Pay Commission News : देशभरातील तमाम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे आठवा वेतन आयोग संदर्भात. खरंतर सरकारी कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून आठवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात सरकारकडे मागणी करत आहेत.

सरकारी कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून यासाठी शासन दरबारी जोरदार पाठपुरावा सुरू असून आता सरकारने या संदर्भात एक मोठी अपडेट दिली आहे. खरंतर वेतन आयोगाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू झाला आहे.

सध्याचा वेतन आयोग हा 2016 मध्ये लागू झाला होता आणि यानुसार पुढील वेतन आयोग म्हणजे आठवा वेतन आयोग हा 2026 मध्ये लागू होणे अपेक्षित आहे. सातवा वेतन आयोग प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना लागू करण्याआधी त्याची स्थापना करण्यात आली होती.

सातवा वेतन आयोगाची स्थापना 2014 मध्ये झाली आणि त्यानंतर दोन वर्षांनी सातवा वेतन आयोग प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना बहाल करण्यात आला. यामुळ, आठवा वेतन आयोग 2026 मध्ये लागू होण्यापूर्वी त्या वेतन आयोगाची स्थापना होणे आवश्यक आहे.

यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आठवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात शासन दरबारी जोरदार पाठपुरावा केला जात आहे. पण, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना केंद्र सरकारने मोठा झटका दिला आहे.

आठवा वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची सरकारने पुन्हा एकदा निराशा केली आहे. 3 डिसेंबरला केंद्रीय अर्थमंत्रालयाने सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होणार की नाही याबाबत स्पष्टचं सांगितले आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, राज्यसभा खासदार जावेद अली खान आणि रामजी लाल सुमन यांनी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात अर्थातच राज्यसभेमध्ये केंद्र सरकार 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये नवीन वेतन आयोगाबाबत घोषणा करण्याचा विचार करत आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला.

यावर उत्तर देताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत सांगितले की, सध्या 8 व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेचा कोणताही प्रस्ताव सरकारसमोर विचाराधीन नाहीये. मात्र असे असले तरी काही जाणकार लोक एक जानेवारी 2026 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होऊ शकतो असे बोलत आहेत.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts