8th Pay Commission : काल गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस होता. येत्या काही दिवसांनी आता नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. नवरात्र उत्सवानंतर विजयादशमी अर्थातच दसरा आणि त्यानंतर दिवाळीचा सण साजरा होणार आहे. दरम्यान यंदाची दिवाळी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूपच आनंदाची ठरणार असे भासत आहे.
कारण की दिवाळीच्या आधीच सरकारी कर्मचाऱ्यांची एक प्रलंबित मागणी पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. सदर नोकरदार मंडळीचा किमान मूळ पगार हा तब्बल आठ हजार रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.
कोणती मागणी पूर्ण होणार?
सध्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू आहे. वेतन आयोगाचा आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला असता पहिला वेतन आयोग 1946 मध्ये लागू झाला होता. यानंतर प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत आला आहे. 2014 साली सातवा वेतन आयोगाच्या समितीची स्थापना करण्यात आली होती आणि 2016 मध्ये हा सध्याचा सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता.
एक जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू आहे. यानुसार 1 जानेवारी 2026 ला नवीन आठवा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे. आतापर्यंत प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू झाला असल्याने नवीन आठवावेतन आयोग हा एक जानेवारी 2026 पासून लागू होणे अपेक्षित असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत सरकार दरबारी पाठपुरावा देखील सुरू आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात आठवावेतन आयोगाबाबत घोषणा होणार अशी अशा प्रत्येकाला होती. मात्र तसे काही घडले नाही.
परंतु आता काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये आठवावेतन आयोगाबाबतची फाईल तयार होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. आठवा वेतन आयोगाची फाईल जवळपास अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसात या संदर्भात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.
यामुळे दिवाळीच्या आधी आठवा वेतन आयोगाबाबत हालचाली पाहायला मिळू शकतात असे बोलले जात आहे. आठवा वेतन आयोग लागू झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ पगार आता आठ हजार रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजेच किमान मूळ पगार हा 18 हजार रुपयांवरून थेट 26000 वर जाणार आहे.