Aadhar Card News : भारतात आधार कार्ड हा एक प्रमुख ओळखीचा पुरावा आहे. हे सरकारी दस्तऐवज जवळपास प्रत्येकच कामात उपयोगी पडते. सिम कार्ड घेण्यापासून ते प्रॉपर्टी विकत घेण्यापर्यंत सर्वच ठिकाणी आधार कार्ड लागते.
शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी आणि बँकेत खाते खोलण्यासाठीही आधार कार्ड लागते. आधार कार्डवर अलीकडे पैसे देखील काढता येतात. आधार कार्डचा उपयोग करून पैसे डिपॉझिट करणे देखील आता शक्य होत आहे.
एवढेच काय तर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने तुमच्यासाठी सुरू केलेल्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आधार कार्ड लागतेच.
मात्र हेच आधार कार्ड तुम्हाला जेलवारी देखील घडवू शकते. जर तुमच्याकडे असणारे आधार कार्ड बनावट असेल तर तुम्हाला तीन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.
बनावट आधार कार्ड वापरल्यास दहा हजार रुपयांचा दंड आणि तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते. स्वतः यु आय डी ए ने ही माहिती दिली आहे.
यामुळे तुमचे आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड बनावट आहे की नाही हे चेक करणे तुमच्यासाठी खूपच गरजेचे आहे. दरम्यान आज आपण आधार कार्ड बनावट आहे की नाही हे कसे चेक करायचे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
तुमच आधार कार्ड बनावट आहे की नाही हे कसे चेक करणार?
तुमचे आधार कार्ड बनावट आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला कोणत्याच शासकीय कार्यालयात जावे लागत नाही. तुम्ही घरबसल्याच हे काम करू शकता. यासाठी तुम्हाला आधारच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागते.
सर्वप्रथम आधारच्या www.uidai.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या. वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला आधार सर्व्हिस या सेक्शनमध्ये जाऊन Verify an Aadhaar Number वर क्लिक करावं लागणार आहे.
मग तुमचा बारा अंकी आधार नंबर टाकून कॅप्चा एंटर करा. आता Proceed To Verify वर क्लिक करा. असं केल्याने तुमचं व्हेरिफिकेशन पूर्ण होईल व तुमचे आधार कार्ड खरं आहे की बनावट ते कळणार आहे.
भारतात बनावट आधार कार्ड वापरणे हे बेकायदेशीर असून असं करताना कुणी आढळलं तर त्याला दहा हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो आणि तीन वर्षांची जेल देखील होऊ शकते. यामुळे तुम्ही तुमचे आधार कार्ड बनावट आहे की नाही हे आजच चेक करायला हवं.