स्पेशल

ब्रेकिंग ! अंगणवाडी कर्मचारी ‘या’ तारखेला जाणार बेमुदत संपावर ; नेमक्या मागण्या तरी काय?

Aganwadi Karmchari Strike : राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांबाबत एक मोठी माहिती हाती येत आहे. अंगणवाडी कर्मचारी 20 फेब्रुवारी पासून बेमुदत संपावर जाणार असल्याचे सांगितले गेले आहे. खरं पाहता, अंगणवाडी सेविकांनी गेल्या अनेक महिन्यांपासून मानधनात वाढ करावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

मात्र असे असले तरी कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर राज्य शासनाने सकारात्मक असा निर्णय घेतला नसल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने 20 फेब्रुवारीपासून संपाचा हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे. कृती समितीने दिलेल्या माहितीनुसार, राज्य शासनाने साडेपाच वर्षांपूर्वी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली होती.

तसेच केंद्र शासनाने साडेचार वर्षांपूर्वी सदर कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली आहे. त्यानंतर महागाईचा वाढता आलेख कायम असला तरी देखील शासनाकडून मानधनात वाढ देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करावी यासाठी वारंवार शासनाकडे निवेदने दिली जात आहेत.

मात्र सदर निवेदनावर शासनाकडून गांभीर्याने लक्ष घातले जात नसून मानधना व्यतिरिक्त इतरही काही प्रलंबित मागण्या अजूनही जैसे थे चं आहेत. परिणामी आता 20 फेब्रुवारीपासून अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. अशा परिस्थितीत आज आपण नेमक्या अंगणवाडी सेविकांच्या मागण्या काय आहेत याविषयी जाणून घेणार आहोत.

अंगणवाडी सेविकांच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे 

सर्वात महत्त्वाची मागणी आहे सेविकांना दिला जाणाऱ्या मानधन मध्ये वाढ करणे.

याशिवाय अंगणवाड्यांचं भाडं, सेवा समाप्ती लाभ देणे या मागण्याही प्रमुख आहेत.

तसेच उन्हाळ्यातील सुट्ट्या बंद झाल्या आहेत त्या देखील सेविकांना दिल्या जाव्यात.

अशा काही मागण्या या सदर कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहेत. दरम्यान आता या प्रलंबित मागण्या शासनाने लवकरात लवकर पूर्ण कराव्यात म्हणून अंगणवाडी सेविका 20 फेब्रुवारी पासून बेमुदत संपावर जात आहेत. यामुळे आता या प्रलंबित मागण्या मान्य होतात का? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts