स्पेशल

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! रब्बी हंगामातील गहू, हरभरा समवेतच ‘या’ पिकांच्या हमीभावात मोठी वाढ, मोदी सरकारचा मोठा निर्णय

Agriculture News : रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खरीप हंगामानंतर आता रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे.

कोरडवाह भागातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी सुरू केली आहे. रब्बी हंगामात गहू, हरभरा, मसूर, मोहरीसारख्या अनेक पिकांची लागवड केली जाते.

आपल्या महाराष्ट्रात गहू आणि हरभरा लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. दरम्यान केंद्रातील मोदी सरकारने आज रब्बी हंगामातील पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

आज 16 ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी हंगामातील पिकांच्या हमीभावात वाढ केली आहे. २०२५-२६ च्या रब्बी हंगामातील पिकांच्या हमीभाव वाढीच्या प्रस्तावाला आज मोदी सरकारने मंजुरी दिली आहे.

यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मोहरी सारख्या पिकांचे हमीभाव वाढले आहेत. दरम्यान आता आपण कोणत्या पिकाचे हमीभाव कितीने वाढवण्यात आले आहेत याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

कोणत्या पिकाला किती हमीभाव मिळणार?

यावर्षी गव्हाच्या हमीभावात केंद्रातील सरकारने 150 रुपयांची वाढ केली आहे. गेल्यावर्षी गव्हाचा हमीभाव 2275 रुपये प्रति क्विंटल एवढा होता मात्र यंदा हाच हमीभाव 2425 रुपये प्रति क्विंटल एवढा झाला आहे.

सरकारने मसूरच्या हमीभावातही २७५ रुपयांची वाढ केली असून मसूरचा हमीभाव २०२५-२६ च्या रब्बी हंगामासाठी ६ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल असा जाहीर करण्यात आला आहे.

सूर्यफुलाच्या हमीभावातही १४० रुपयांची वाढ झाली असून यंदाच्या रब्बी हंगामात सूर्यफुलाचा हमीभाव ५ हजार ९४० रुपये एवढा जाहीर करण्यात आला आहे. तसेच बार्लीसाठी १९८० रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे.

मोहरीचा हमीभाव तीनशे रुपयांनी वाढवत 5950 रुपये प्रति क्विंटल साकारण्यात आला आहे. केंद्राने हरभऱ्याचा हमीभाव २१० रुपयाने वाढवला असून आता हा हमीभाव ५ हजार ६५० रुपये प्रतिक्विंटल असा जाहीर करण्यात आला आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts