स्पेशल

अमेरिकन व्यक्तीच भारतीय शेतकऱ्यांसाठी भन्नाट संशोधन; तयार केला मायक्रो सोलर पंप, कसा होतोय शेतकऱ्यांचा फायदा? पहा…

Agriculture News : भारतीय अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. शेती व्यवसायाचा भारतीय अर्थव्यवस्थेतला वाटा मोठा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी भारतीय शास्त्रज्ञांच्या माध्यमातून कायमच नवनवीन संशोधन केले जाते. मात्र असे असले तरी अद्याप भारतीय शेतकऱ्यांच्या सर्व समस्या समूळ नष्ट झालेल्या नाहीत.

देशातील शेतकऱ्यांपुढे अनेक समस्या आजही कायम आहेत. यामध्ये विजेची समस्या ही मोठी आहे. भारतीय स्वातंत्र्याची जवळपास 75 वर्षे उलटली तरीही देशातील शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी शाश्वत विजेची उपलब्धता झालेली नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही परिणामी त्यांच्या पीक उत्पादनात घट होते. दरम्यान शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन दोन अमेरिकन व्यक्तींनी मायक्रो सोलर पंप तयार केला आहे.

यामुळे आता शेतकऱ्यांसाठी विजेचे शाश्वत उपलब्धता झाली असून हा मायक्रो सोलर पंप चोरीला देखील जाऊ शकणार नाही. कॅटी टेलर आणि व्हिक्टर लेस्नीवस्की या जोडीने हा मायक्रो सोलर पंप तयार करण्याची किमया साधली आहे.

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! पावरग्रीड कॉर्पोरेशन मध्ये ‘या’ पदाची भरती सुरू, आजच करा अर्ज

आम्ही आपणास सांगू इच्छितो की सर्वप्रथम या दोघांनी शेतकऱ्यांसाठी खेतवर्क या स्टार्टअपची सुरुवात केली. ते एम आय टी मध्ये शिक्षण घेत असताना टाटा ट्रस्ट सोबत जोडले गेले होते. टाटा ट्रस्टच्या सानिध्यात आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांसाठी स्वतःच स्टार्टअप सुरू केले.

यापूर्वी त्यांनी ओडिशा आणि झारखंड मधील अनेक शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. यानंतर त्यांना शेतकऱ्यांसमोर असलेली विजेची समस्या प्रकर्षाने जाणवली. तसेच सध्या अस्तित्वात असलेले सोलार पंप शेतीमधून चोरी होत असल्याची घटना त्यांना दिसली.

यामुळे त्यांनी असा सोलर पंप विकसित करण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न तर निकाली निघेलच शिवाय तो सोलर पंप चोरी देखील होऊ शकणार नाही. या पार्श्वभूमीवर मग या अमेरिकन व्यक्तींनी नवीन प्रकल्पावर मोठ्या जोमात काम सुरु केले. यासाठी त्यांनी फंडीग जमा केली.

हे पण वाचा :- म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 4 हजार 83 घरांसाठी सोमवारी निघणार जाहिरात; कोणत्या भागातील घरांचा राहणार समावेश? किंमत किती, पहा….

सोबतच भारत सरकारकडून मायक्रो सोलर पंपचा आरखडा मंजूर करणे, पेटेंट घेणे, पुणे शहरात युनिट उभे करण्याचे काम त्यांनी केले. त्यानंतर मग त्यांनी मायक्रो सोलार पंप विकसित केला असून हा मायक्रोसोलार पंप शेतकऱ्यांना उपलब्ध देखील करून दिला आहे.

कॅटी टेलर आणि व्हिक्टर लेस्नीवस्की यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मायक्रो सोलर पंप खूपच लहान आहे त्यामुळे हा सोलार पंप रोज शेतात घेऊन जाणे सोपे आहे तसेच शेतातून घरी आणणे देखील सोपे आहे.

यामुळे शेतातून सोलर पंपांची होणारी चोरी कमी होणार आहे. विशेष म्हणजे हा पंप महिला देखील शेतात घेऊन जाऊ शकतात. यामुळे छोट्या शेतकऱ्यांचे जवळपास दहा ते बारा हजार रुपयाचे वार्षिक विज बिलाची बचत होत आहे.

आतापर्यंत या दोन अमेरिकन व्यक्तीने सुरू केलेल्या स्टार्टअप च्या माध्यमातून 900 शेतकऱ्यांना हा सोलार पंप उपलब्ध करून देण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी या सोलर पंपाचा वापर सुरू केला आहे त्यांना याचा फायदा होत असून या दोन अमेरिकन व्यक्तींनी सुरू केलेल्या या स्टार्टअपचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे.

हे पण वाचा :- समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते ठाणेचा टप्पा झाला पूर्ण ! दोन पूल, दोन बोगदे अन एक इंटरचेंज; काय आहेत या मार्गाच्या विशेषता?

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts