स्पेशल

अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! शिंदे सरकारने दिली 63 कोटींची मदत; केव्हा खात्यात जमा होणार? पहा…..

Agriculture News : राज्यात सध्या अवकाळी पाऊस आणि गारपीट शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. अवकाळी पावसाने आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झाले आहे. रब्बी हंगामातील पीक पूर्णतः वाया गेले असून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका यामुळे बसला आहे.

अशा परिस्थितीत शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. यानुसार पंचनामे पूर्ण झाले असून आता नुकसान भरपाईची रक्कम देखील शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये संपूर्ण राज्यासाठी 177 कोटी 39 लाख 91 हजार रुपये इतकी नुकसान भरपाई शिंदे फडणवीस सरकारने दिली आहे.

हे पण वाचा :- 10वी पास उमेदवारांना नोकरीची संधी ! ‘या’ पदासाठी मोठी भरती सुरु, अर्ज कुठं करणार, पहा…..

यामध्ये उत्तर महाराष्ट्राचा विचार केला असता म्हणजेच अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा विचार केला असता या जिल्ह्यांसाठी मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 63 कोटी 9 लाख 77 हजार रुपये मंजूर झाले आहेत.

70 हजार 666 शेतकरी गेल्या महिन्यात 4 ते 8 मार्च आणि 16 मार्च ते 19 मार्च दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे प्रभावित झाले होते. शेतकऱ्यांना आता ही मंजूर झालेली रक्कम मिळणार आहे.

हे पण वाचा :- अहमदनगर, पुणे, सातारा, नाशिक, नंदूरबार, धुळे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात गारपीटीची शक्यता; भारतीय हवामान विभागाची माहिती

आम्ही आपणास सांगू इच्छितो की मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. राज्याच्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसानीची नोंद झाली आहे.

दरम्यान आता शिंदे फडणवीस सरकारने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करून मोठा दिलासा देण्याचे कार्य केले आहे. शासनाच्या या निर्णयाचे कौतुक केले जात असले तरी देखील आता प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम नेमकी केव्हा वर्ग होते याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! पदवीधर उमेदवारांना ‘या’ कृषी विद्यापीठात नोकरीची संधी; इथे पाठवा अर्ज

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts