Agriculture News : अलीकडे सोशल मीडियाचा वापर मोठा वाढला आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियाचा जसा जसा वापर वाढत आहे तसतशी सोशल मीडियाची व्याप्ती देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक अलीकडे सर्वात जास्त वापरले जात आहे. विशेष म्हणजे फेसबुक आता फक्त मेसेज करण्यासाठी अन फोटोज आणि व्हिडिओज शेअर करण्यापुरतचं मर्यादित राहिलं नाही.
फेसबुक चा वापर आता वस्तूंची खरेदी विक्री करण्यासाठी देखील केला जात आहे. यामध्ये मार्केट प्लेस चा ऑप्शन फेसबुक ने उपलब्ध करून दिला आहे. दरम्यान फेसबुक वर शेती उपयोगी साहित्यांचा देखील खरेदी विक्रीचा व्यापार होत आहे.
विशेष म्हणजे आता बैल, म्हैस गाय इत्यादी पशु देखील फेसबुकच्या माध्यमातून खरेदी-विक्री केले जात आहेत. मात्र फेसबुकवर केल्या जाणाऱ्या या खरेदी विक्री मध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक देखील होत आहे. दरम्यान आता असंच एक उदाहरण समोर येत आहे ते धारूर तालुक्यातून. धारूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने फेसबुक वर बैलजोडी पाहून खरेदीसाठी ती जोडी बुक केली.
बैल जोडी बुक केल्यानंतर या शेतकऱ्याकडून समोरच्या अज्ञात व्यक्तीने 95 हजार रुपयाची मागणी केली. बैल जोडी मनात भरली असल्याने सदर शेतकऱ्याने इतर गोष्टींची शहानिशा करण्यापूर्वीच पैसे त्या अज्ञात व्यक्तीला पाठवले. मात्र त्या व्यक्तीने बैलजोडी काही पाठवली नाही, म्हणजे त्या शेतकऱ्याची या ठिकाणी फसवणूक झाली आहे. धारूर तालुक्यातील मौजे कारी येथील ज्ञानेश्वर दगडू फरताडे असे या पीडित शेतकऱ्याचे नाव आहे.
दरम्यान या प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की ज्ञानेश्वर यांनी 19 जानेवारी रोजी फेसबुक वर एका बैल जोडीची जाहिरात पाहिली. या जाहिरातीत ही बैलजोडी विक्रीसाठी असल्याचे सांगितले गेले. ज्ञानेश्वर यांना बैलजोडी खरेदी करायची होती यामुळे त्यांनी त्या ठिकाणी नमूद केलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क साधला.
मोबाईल नंबर वर संपर्क साधल्यानंतर सुरुवातीला ज्ञानेश्वर यांच्यासोबत त्या अज्ञात इसमाने बैल जोडी बाबत विस्तृत चर्चा केली आणि ज्ञानेश्वर यांचा विश्वास संपादित केला. त्यानंतर बैल जोडी शासकीय वाहनाने पाठवतो असं सांगत वेगवेगळ्या कारणाने ज्ञानेश्वर यांच्याकडून 95 हजार 144 रुपये त्या अज्ञात व्यक्तीने मागवले. मात्र पैसे पाठवूनही बैल जोडी न्यानेश्वर यांना मिळाली नाही. यामुळे ते वारंवार सदर क्रमांकावर संपर्क करत होते.
परंतु ज्ञानेश्वर यांना संपर्क करूनही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर ठाण्यात धाव घेऊन दोन अनोळखी व्यापारी व एक अनोळखी वाहन चालक, अशा तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. यामुळे शेतकरी बांधवांना कोणत्याही वस्तूंची खरेदी करण्याअगोदर शहानिशा करण्याचा सल्ला दिला जात आहे.
यामुळे कोणत्याही वस्तूची खरेदी करताना अधिकृत कंपनीच्या संकेतस्थळ व वेबसाईटवर जाऊनच ऑनलाइन खरेदी करावी असा सल्ला जाणकारांकडून दिला जात आहे. याशिवाय ऑनलाइन खरेदी करताना कोणत्याही अज्ञात व्यक्तीवर विश्वास ठेवून पैश्यांची देवाणघेवाण करू नये असं देखील सांगितले गेले आहे.