Agriculture News : शेतकऱ्यांसाठी एक अतिशय चिंताजनक बातमी समोर येत आहे. खरंतर आधीच यावर्षीच्या मान्सून आगमनाला उशीर होत आहे. सर्वसाधारणपणे एक जूनला केरळमध्ये येणारा माणूस यंदा आठ दिवस उशिराने अर्थातच आठ जूनला केरळमध्ये दाखल झाला आहे.
राज्यात मान्सून तळ कोकणामध्ये सात जूनला दाखल होतो यंदा मात्र 15 जून पर्यंत तळ कोकणात मान्सून दाखल होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अर्थातच जवळपास एक आठवडा मान्सूनचे आगमन लांबले आहे. अशातच एलनिनो सक्रिय झाल्याची माहिती एका प्रतिष्ठित संस्थेच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
याआधीही अनेक हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांनी यंदा एलनिनोच सावट राहील असा अंदाज बांधला आहे. दरम्यान आता अमेरिकेच्या नोआ म्हणजे National Oceanic and Atmospheric Administration या संस्थेने एलनिनो सक्रिय झाल्याची माहिती दिली आहे.
हे पण वाचा :- कापूस लागवड केलाय किंवा लागवडीच्या तयारीत असाल तर तज्ज्ञांचा ‘हा’ सल्ला वाचाच !
आधीच मान्सूनचे आगमन उशिराने होत असल्याने चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत यामुळे आणखीनच भर पडली आहे. खरतर, प्रत्येक तीन ते सहा वर्षांनी भारतीय मान्सूनला एल निनोचा फटका हा बसत असतो. याआधी 2018 मध्ये देखील एलनिनो या हवामान प्रणालीमुळे मान्सून प्रभावित झाला आहे.
त्यावेळी संपूर्ण मान्सून काळात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. यामुळे शेतकऱ्यांच्या पिक उत्पादनात घट आली होती आणि शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते.
अशातच यंदा पुन्हा एकदा एल-निनोचा फटका भारतीय मानसूनला बसणार आहे. आतापर्यंत एलनीनो येईल असं सांगितलं जात होतं आता मात्र एलनिनो सक्रिय झाल्याची माहिती अमेरिकेच्या नोआ या संस्थेच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
हे पण वाचा :- घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सिडको ‘या’ भागात काढणार 5000 घरांसाठीची लॉटरी, वाचा….
त्यामुळे शेतकऱ्यांसहित सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, भारतीय मानसून हा जून ते सप्टेंबर या कालावधीत असतो. आता या पावसाळ्याच्या काळात विशेषता 15 जुलै किंवा एक ऑगस्ट नंतर या एलनिनोचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
15 जुलै किंवा एक ऑगस्ट नंतर या हवामान प्रणालीमुळे पावसाचा खंड पडू शकतो, दुष्काळी परिस्थिती तयार होऊ शकते, यामुळे नापीकी आणि आणि टंचाईचा मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
निश्चितच या हवामान प्रणालीमुळे यंदा शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनात देखील घट होणार आहे आणि याचा फटका सर्वच क्षेत्राला बसण्याची शक्यता आहे. यामुळे महागाई देखील मोठ्या प्रमाणात वाढेल अशी भीती आता व्यक्त केली जात आहे.
हे पण वाचा :- पंजाब डख यांचा हवामान अंदाज : राज्यात आजपासून पावसाला सुरवात होणार; किती दिवस पाऊस राहणार? वाचा…