Ahilyanagar Farmer Scheme : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना चालवल्या जात आहेत. केंद्रातील सरकारच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी योजना, पीएम किसान मानधन योजना, पिक विमा योजना अशा असंख्य योजना सुरू आहेत.
दुसरीकडे महाराष्ट्र राज्य शासन नमो शेतकरी योजनासारख्या अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न शासनाकडून होतोय. अशातच आता महाराष्ट्र राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतलाय.
आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन उपक्रम हाती घेण्यात आला असून या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना युनिक किसान आयडी नंबर मिळणार आहे. या फार्मर आयडीमुळे शेतकऱ्यांना जलद गतीने सेवा उपलब्ध होणार आहेत.
हा फार्मर आयडी आधार कार्ड सारखाच राहणार आहे. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात डिजिटिलायझेशन झाले असून याचसाठी शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आयडी दिला जाणार आहे. विशेष बाब अशी की, यासाठी अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली आहे.
मात्र, फार्मर आयडी फक्त आणि फक्त ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन आहे त्यांनाच मिळणार आहे. शेत जमिनीच्या नोंदी, गावाचे नकाशे आता डिजिटल केले जात आहेत. दरम्यान या फार्मर आयडीमुळे शेतकऱ्यांना या सुविधा आणि सेवा मिळणार आहेत.
याशिवाय शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केले जात आहे. यातून पीक संरक्षण, हवामानाचे अंदाज, जमिनीचे आरोग्य, भूजल पातळी इत्यादी माहिती एकत्रित करून त्यावर आधारित सपोर्ट सिस्टम तयार होणार आहे.
फार्मर आयडी चा वापर शेतकऱ्यांना अनेक कामांमध्ये होणार असून त्यांचा पैसा आणि वेळ यामुळे वाचणार आहे. फार्मर आयडी तयार करण्याची जबाबदारी ही महसूल विभागाकडे सोपवण्यात आले असून मार्च महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
यातून शेतकऱ्यांना शेतीविषयक सल्ला देखील दिला जाणार आहे. पिकांची पेरणी कधी करायचे कोणत्या प्रकारे पेरणी करायची बियाणे कोणते वापरायचे याबाबतचे मार्गदर्शन यामधून होईल असे सांगितले जात आहे. याचा सर्वात मोठा फायदा असा होणार आहे की, सध्या कोणत्याही कृषी योजनेसाठी अर्ज करताना शेतकऱ्यांना पडताळणी करावी लागते.
योजनांसाठी अर्ज करताना प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना पडताळणी करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतात आणि त्यांचा वेळ वाया जातो. काही वेळेस शेतकऱ्यांना वेळेवर कागदपत्रे मिळत नाही त्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र या फार्मर आयडीमुळे या सर्व गोष्टींचा मनस्ताप दूर होणार आहे आणि शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.