Ahilyanagar Job News : अहिल्यानगर मध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेत विविध रिक्त पदांसाठी नुकतीच भरती जाहीर करण्यात आली आहे.
ही सहकारी बँक नगर जिल्ह्यातील एक महत्त्वाची बँक आहे. या बँकेच्या एकूण 11 शाखा असून 900 कोटी रुपयांचा समिश्र व्यवसाय आहे. या बँकेच्या कार्यक्षेत्राबाबत बोलायचं झालं तर बँकेचे पाच जिल्ह्यांमध्ये कार्यक्षेत्र आहे.
या पद भरतीची अधिसूचना नुकतीच निर्गमित झाली असून त्यासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या माध्यमातून अर्ज मागवले जात आहेत. दरम्यान आज आपण सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेत निघालेल्या या पदभरतीची अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या पदांसाठी निघाली भरती?
मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
या पद भरती अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या या रिक्त पदासाठी कुठल्याही शाखेचा पदवीधर आणि 1) सीएआयआयबी / डिबीएफ / डिप्लोमा इन को-ऑपरेटिव्ह बिझनेस मॅनेजमेंट किंवा समतुल्य पात्रता किंवा 2) चार्टर्ड / कॉस्ट अकाउंटंट/ एमबीए फायनान्स किंवा 3) कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी / वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य. उमेदवारास CEO/DGM/AGM पदावरील बँकेमधील किमान ५ वर्षाचा अनुभव तसेच बँकिंग सेक्टरमधील मध्यम/वरिष्ठ श्रेणी अधिकारी पदाचा किमान ८ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. या पदासाठी महत्त्वाची अट म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेस अधीन राहून पात्र उमेदवाराची नेमणूक करण्यात येईल.
वयोमर्यादा
या भरतीसाठी 35 ते 65 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत.
अर्ज कसा करावा लागणार?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे. इच्छुक उमेदवारांना बँकेच्या अधिकृत ईमेल आयडीवर मेल करून आपला अर्ज सादर करावा लागणार आहे. ceo@sbtabank.in हा बँकेचा अधिकृत ईमेल आयडी असून याच ईमेल आयडीवर इच्छुक उमेदवारांना आपला अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक
आपले अर्ज दिनांक २४.१२.२०२४ पर्यंत वर नमुद मेल आयडीवर पाठवायचे आहेत.