स्पेशल

अहिल्यानगर : 2025 मध्ये वर्षभर महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडणार !

Ahilyanagar News : सहा महिन्यांपूर्वी देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्यात. यानंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्यात. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिला.

इतिहासात पहिल्यांदाच महायुतीला एवढे बहुमत मिळालयं. 2024 हे वर्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे गाजले. दरम्यान 2025 मध्ये देखील अहिल्यानगर जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात पुढील वर्षी म्हणजे 2025 मध्ये महानगरपालिका, जिल्हा परिषद, 14 पंचायत समिती, 12 नगरपालिका आणि 99 ग्रामपंचायतीसाठी निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.

यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा अहिल्यानगर जिल्ह्यात राजकीय रणधुमाळी दिसेल आणि या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच राजकीय पक्षांच्या माध्यमातून तयारी सुरू करण्यात आली आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या उमेदवारांसाठी मोठी कसरत घेतलेली आहे. यामुळे आता आमदार, खासदारांना या निवडणुकांमध्ये तिकीट वाटप करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

साहजिकच, या निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या फारच अधिक राहणार आहे अन यामुळे तिकीट वाटपात रुसवे-फुगवे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार असून आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळता सांभाळता आमदार, खासदारांच्या नाकी नऊ येणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मागील दोन अडीच वर्षांपासून जिल्ह्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती यांच्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असून या निवडणुका लवकरात लवकर होणे गरजेचे आहे.

अहिल्यानगर महानगरपालिकेत 68 नगरसेवकांचे संख्याबळ असून त्या ठिकाणी डिसेंबर 2023 पासून प्रशासकांच्या हाती कारभार आहे. अहिल्यानगर जिल्हा परिषदेबाबत बोलायचं झालं तर तिथे 73 सदस्यांचे संख्याबळ असून त्या ठिकाणी मार्च 2022 पासून प्रशासक कारभार पाहत आहेत. 2024 डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील 84 ग्रामपंचायतीची मुदत संपणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 दरम्यान आणखी 14 ग्रामपंचायतची मुदत संपणार असून या संबंधित ग्रामपंचायतीची प्रभाग रचना कार्यक्रम सुद्धा जाहीर करण्यात आला आहे. यामुळे पुढील वर्षी या कार्यकाळ संपणार्‍या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम राहणार आहे.

पण, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणे या निवडणुका लढवल्या जाणार नाहीत. लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये झाल्या होत्या. मात्र या पंचायतराजच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर आघाडी बनवून निवडणूक लढवली जाईल किंवा स्वातंत्र्य निवडणूक लढवली जाणार आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts