स्पेशल

अहमदनगरमधील अजितदादांच्या ‘या’ आमदाराची विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी निवड

Ahmednagar Politics : अहमदनगरमधील अकोले मतदार संघातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांना प्रमोशन मिळाले आहे. आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी आमदार किरण लहामटे यांची वर्णी लागली असून प्रथमच आमदार म्हणून निवडून आलेल्या लहामटे यांच्यासाठी ही मोठी संधी मानली जातेय. आजपासून (ता. 27 जून) विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात झाली असून विविध राजकीय घडामोडी आज घडल्या.

राष्ट्रगीतानंतर विधानसभेच्या कामकाजास सुरुवात झाली व विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षांची तालिका अध्यक्ष म्हणून पाच आमदारांची निवड केली. विधानसभेच्या पाच तालिका अध्यक्ष म्हणून ज्या निवडी झाल्या त्यामध्ये भाजपकडून दोघांना, राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदेंची शिवसेना व काँग्रेसकडून आमदाराची वर्णी येथे लागली.

तालिका अध्यक्ष म्हणून जे पाचजण निवडले त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून किरण लहामटे, काँग्रेसकडून अमिन पटेल यांना संधी तालिका अध्यक्ष म्हणून मिळाली. भाजपकडून आ. कालिदास कोळंबकर यांच्यासह समाधान आवताडे यांना तर शिवसेना शिंदे गटाकडून संजय शिरसाट या आमदारांना संधी मिळाली आहे.

किरण लहामटे हे अकोले मतदारसंघातून 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार माजी आ. वैभव पिचड यांचा पराभव केला होता. आता त्यांना येथे संधी मिळाल्याने त्यांच्यासाठी ही कलाटणी देणारी घटना असेल असे म्हटले जात आहे.

मंत्रिपदाच्या चर्चा
अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळेल अशा चर्चा होत्या. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल व यामध्ये त्यांना संधी मिळेल अशा चर्चा होत्या. परंतु आजपासून हे अधिवेशन सुरु झाले असून मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. दरम्यान आता भविष्यात जर मंत्रिमंडळ विस्तार झाला तर त्यांना संधी मिळू शकते असे म्हटले जात आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts